विठ्ठल रुक्मिणीमातेच्या बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसादापासून वारकरी भाविक वंचित

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद न मिळाल्याने वारकरी भाविकांची संप्त प्रतिक्रिया.

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसादापासून वारकरी भाविक वंचित

पंढरपूर कार्तिकी एकादशी दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसादापासून वारकरी भाविक वंचित.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा प्रसाद न मिळाल्याने वारकरी भाविकांची संप्त प्रतिक्रिया.

शुक्रवार दि.. 4 नोव्हेंबर आज पंढरपूर येथील कार्तिक एकादशी निमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची सत्पनिक शासकीय महापूजा संपन्न झाली आहे.

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर आरोग्य मंत्री श्री तानाजी सावंत लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे युवा नेते प्रणव परिचारक अन्य राजकीय मंडळी पूजेसाठी उपस्थित होते. कार्तिक एकादशी सोहळा सोहळा संपन्न होत असताना पंढरपूरमध्ये महाराष्ट्रातून एकंदरीत 4ते 5 लाख भाविकांच्या साक्षीने कार्तिक यात्रा सोहळा संपन्न झाला आहे.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसाद पुरवठा करणारी नाशिक येथील यशोधरा सहकारी संस्थेस मंदिर समितीने वारंवार बुंदी लाडू राजगिरा लाडू प्रसाद पुरवणीच्या सूचना दिल्या असतानाही या यशोधरा संस्थेकडून मात्र आज एन कार्तिकी एकादशी सोहळ्या दिवशीही बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसाद श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला पुरवठा न केल्याने मंदिर समितीकडून वारकरी भाविकांना बुंदी लाडू व राजगिरा लाडू प्रसाद न मिळाल्याने वारकरी भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया ऐकण्यास मिळत होत्या तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासना बद्दल नाराजी व्यक्त करताना दिसत होते.

शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील कार्तिक एकादशी सोहळा संपन्न होत असताना आज मंदिर प्रशासनाने वारकरी भाविकांना बुंदी लाडू राजगिरा लाडू प्रसाद दिवसभर सुरू ठेवून पुरवठा करणे गरजेचे असताना काही ठिकाणचा लाडू प्रसाद विभाग बंद करण्यात आला होता. या बाबतीत संबंधित जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून मंदिर समितीच्या लाडू प्रसाद संदर्भात असणारी नेहमीची तक्रारीची दखल घेऊन वारकरी भाविकांना लाडू प्रसाद संदर्भात योग्य तो न्याय देण्यात यावा या प्रकरणी वारकरी भाविकां मध्ये जोराने चर्चा मंदिर परिसरामध्ये सुरू आहे. आज पर्यंत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ज्या यशोधरा संस्थेला लाडू प्रसादासाठी अधिकृतपणे निविदा काढून टेंडर दिले त्या टेंडर प्रमाणे आज पर्यंत या संस्थेने मंदिर समितीला लाडू पुरवठा केला नसल्याने यशोधरा लाडू प्रसाद पुरवठा या संस्थेला दहा वेळा मंदिर समितीने नोटीस काढली असल्याचे समजते. सदर यशोधरा सहकारी संस्था यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लाडू प्रसाद पुरवठा करण्यासाठी दिलेले टेंडर त्वरित रद्द करून पुरवठा करणाऱ्या संस्थेला तत्काळ टेंडर देऊन वारकरी भाविकांना यापुढे तरीश्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा व पंढरीचा लाडू प्रसाद मिळावा अशी अपेक्षा वारकरी भाविकांतून व्यक्त केली जात आहे. मागील आषाढी यात्रेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने लाडू प्रसाद पुरवठा करणाऱ्या यशोदारा संस्थेला नियमाप्रमाणे लाडू प्रसाद पुरवठा करण्याची जबाबदारी दिली होती परंतु त्यावेळीही यशोधरा संस्थेने लाडू प्रसाद पुरवठा मागणीप्रमाणे केला नसल्याने आषाढी यात्रा काळात ही वारकरी भाविकांना प्रसादापासून वंचित रहावे लागले होते. सदर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर लाडू प्रसाद संदर्भात मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला तशा लेखी सूचना देऊन बंदोबस्त करण्यात यावा अन्यथा पुढील यात्रा काळामध्ये वारकरी भावीक लाडू प्रसाद पासून वंचित राहिल्यास विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती समोर महाराज मंडळी व वारकरी भावीक भव्य उपोषण आंदोलन करतील असे काही वारकरी व महाराज मंडळींनी आज आमच्या साई सम्राट न्यूजशी बोलताना सांगितले.