लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पुरस्काराने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सन्मानित

जिल्हा निर्देशांक 2022 पुरस्काराने आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना गौरविण्यात आले

लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पुरस्काराने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सन्मानित

लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पुरस्काराने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सन्मानित

सोलापूर, दि. 3 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकसत्ता जिल्हा निर्देशांक 2022 पुरस्काराने आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना गौरविण्यात आले. मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष राजीव करंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यावेळी उपस्थित होते.

दै. लोकसत्ताने प्रथमच जिल्हा निर्देशांक उपक्रम हाती घेतला. सांख्यिकी विभागाकडे असलेल्या तपशीलाच्या आधारे पुणे येथील विख्यात गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे विविध जिल्ह्यांच्या कामगिरीचे विश्लेषण केले गेले. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याने विविध विकास निर्देशांकबाबत पहिला क्रमांक नोंदविला. या निर्देशांकाचे सादरीकरण यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.