जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे - ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे
महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य असे स्मारक झाले पाहिजे

जातीपातीचे निर्मूलन करण्याची नामी संधी संविधानात आहे - ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे
पत्रकारांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन
पंढरपूर(प्रतिनिधी):- महाराष्ट्रातील विविध संतांनी एकत्र येऊन जाती-जातीत भेदभाव न करता हे विश्वचि माझे घर हा संदेश देऊन सर्वांना एकत्र आणले परंतु आज मात्र प्रत्येक जातीत स्पर्धा असल्याचे दिसत असून सर्व जाती विभागल्याने भारतीय स्वातंत्र्यावर एक संकट उभारले आहे. हे संकट जर घालवायचे असेल तर जगातील एकमेव महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने हे शक्य होईल असे उदगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने पत्रकारांच्या सन्मान कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी काढले.
यावेळी बोलताना बडवे पुढे म्हणाले की महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत पुष्कळ बोलता येईल. बाबासाहेबांच्या वेळी राजकारण शुद्ध आणि चारित्र्यसंपन्न होते. आजचे राजकारण, समाजकारणच काय पत्रकारितेतही बदल झाले आहे. हे सर्व पूर्वपदावर आणायचे असेल तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानेच शक्य होईल असा विश्वास बडवे यांनी व्यक्त केले. दरम्यान डॉ. बाबासाहेबांच्या महान कार्याची प्रेरणा मिळावी यासाठी पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी महामानव डॉ बाबासाहेबांचे भव्य असे स्मारक झाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत यासाठी सर्व पत्रकार पाठीशी राहतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
पंढरपुरात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये पंचशील तरुण मंडळाने डॉल्बी मुक्त जयंती साजरी करण्याचा संकल्प करत पारंपारिक वाद्य वाजवून मिरवणूक काढली जाणार आहे. महिलांसाठी होम मिनिस्टर, भीम गीतांचा कार्यक्रम असे स्तुत्य उपक्रम राबवून समाज हिताचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट महेश कसबे यांनी सांगितले.यावेळी जेष्ठ पत्रकार अभय जोशी, सुनील उंबरे,दिनेश खंडेलवाल, हरिभाऊ प्रक्षाळे,रामभाऊ सरवदे, पत्रकार दिपक चंदनशिवे, सचिन कांबळे, सुधीर सोनटक्के, अपराजित सर्वगोड, सुरज सरवदे, नवनाथ खिलारे, राजेंद्र ढवळे, विनोद पोतदार, लखन साळुंखे, नागेश काळे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ अशी प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला.
मंडळाचे अध्यक्ष ॲड. महेश कसबे, दिपक चंदनशिवे, आर.पी.कांबळे, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, मुकुंद मागाडे, दीपक साबळे, पोपट क्षीरसागर, सुजय बनसोडे, सचिन गाडे, राजेंद्र भालेराव, संदीप कसबे, निलेश कांबळे, शशिकांत चंदनशिवे, सागर चंदनशिवे यांच्यासह महिला, आम्रपाली महिला मंडळ, नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.