उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिक एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरीत दाखल
पंढरपूर येथील कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्तिक एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरीत दाखल
पंढरपूर गुरुवार दि..3 नोव्हेंबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या पंढरपूर येथील कार्तिक एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पहाटे संपन्न होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर मुख्यमंत्री असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली होती त्यानंतर पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशी निमित्त शासकीय महापूजा करण्याचा मान त्यांना मिळाला आहे.
आज पंढरपूर येथील कराड चौक ते वाखरी कडे निघणाऱ्या बायपास त्याचे भूमिपूजन . पंढरपूर तीर्थक्षेत्र आराखडा अधिकाऱ्यासमवेत बैठक तसेच वारकरी संप्रदाय यांच्यासाठी वेळ देणार आहेत.
पंढरपूर कार्तिकी एकादशी सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रात्री दोन ते अडीच च्या दरम्यान संपन्न होणार आहे.