श्रीविठठ्लाचे मुखदर्शन संपुर्ण दिवस चालु ठेवण्याची हिंदुमहासभेची मागणी

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची घेतली शिष्टमंडळाने घेतली भेट

श्रीविठठ्लाचे मुखदर्शन संपुर्ण दिवस चालु ठेवण्याची हिंदुमहासभेची मागणी

श्रीविठठ्लाचे मुखदर्शन संपुर्ण दिवस चालु ठेवण्याची हिंदुमहासभेची मागणी

भाविकांची गैरसेाय व स्थानिक व्यापारी दुकानदारांच्या व्यवसायावर होणार परिणाम

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची घेतली शिष्टमंडळाने घेतली भेट

पंढरपुर दि.14 मार्च ..श्रीविठठ्ल 15 मार्च पासून गर्भगृहाच्या सुशोभिकरणासाठी पंढरपूरच्या श्रीविठठ्ल मंदिरातील पदस्पर्श दर्शन बंद होणार असल्याने दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची मोठी गैरसोय होणार असून स्थानिक व्यापारी,दुकानदार यांची उपासमार होणार आहे त्यामुळे मंदिर समितीने या निर्णयाचा फेरविचार करुन मुखदर्शन तरी किमान दिवसभर ठेवावे या मागणीसाठी हिंदुमहासभेच्या शिष्टमंडळाने श्रीविठठ्ल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची भेट घेेतली.यावेळेस श्री शेळके यांनी होणार्‍या गैरसोयीचा विचार करण्याचे व लवकरात लवकर जिणोध्दाराचे काम पुर्ण करण्याचे अश्वासन दिले.

श्रीविठठ्ल मंदिराच्या गाभार्‍यात काही वर्षापुर्वी मुळ असणार्‍या दगडी बांधकामावर सुशोबिकरणाच्या नावाखाली ग्रेनाईट फरशी बसविण्यात आली होती तेव्हाही हिंदुमहासभेने या विरोधात तक्रार नोदविली होती मात्र त्याचा विचार करण्यात आला नव्हता.पुरातन वास्तुशास्त्रज्ञांनी मंदिराचे बांधकाम करताना केलेल्या वायुविजनाच्या सुविधा तसेच नैसंर्गिक रित्या मंदिराच्या गाभार्‍यातील तापमान नियंत्रीत राहण्यासाठी करण्यात आलेली सुविधा यामुळे नाहीशी झाली.पुढे काही वर्षांनी त्याचे प्रतिकूल परिणाम दिसु लागले.वाढत्या तापमानाचा श्रीविठठ्ल मुर्तीवर होणारा परिणाम,गाभार्‍यातील सेवेकर्‍यांना श्वसनाचे त्रास होणे आदी प्रकार सुरु झाले.सुशोभिकरणाच्या नावाखाली मंदिरात वेळोवेळी नियुक्तीला असलेल्या अधिकार्‍यांनी व समितीने मंदिराचे पुरातन वैभव नष्ट केले.आता पुन्हा मंदिराला पुरातन वैभव प्राप्त करुन देण्यासाठी शासनाने दिलेला 73 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे.आता तरी पुर्ण विचार करुन पुरातन वास्तुशास्त्राचा व मुर्ती शास्त्राचा अभ्यास असणार्‍या तज्ञांचा सल्ला घेवुन काम करावे अशी मागणी करण्यात आली आण तज्ञांचा सल्ला घेवुनच काम करीत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी स्पष्ट केले.तसेच गाभार्‍यातील ग्रेनाईट व खाली बसविलेली फरशी काढताना धुळ,फरशीचे तुकडे,माती उडण्याची शक्यता विचारात घेवून कामाचे नियोजन करण्यात आले असून श्रीविठठ्ल मुर्तीलाही या कामा दरम्यान कोणतिही इजा पोहाचणार नाही याची दक्षता घेत काम करावे लागणार आहे त्यामुळे हे काम अत्यंत काळजी पुर्वक करावे लागणार असल्याने कामास वेळ लागणार आहे तरीही आम्ही लवकरात लवकर काम संपवुन दर्शन पुर्ववत सुरु करणार आहोत त्यासाठी नागरीकांनी व भाविकांनी सहकार्य करावे असे अवाहन श्री शेळके यांनी केले.या प्रसंगी हिुदंमहासभा नेते अभयसिंह कुलकर्णी,अध्यक्ष बाळासाहेब डिंगरे,पत्रकार महेश खिस्ते,विवेक बेणारे ,गणेश लंके आदी उपस्थित होते.

दर्शनासाठी येणारे भाविक स्थानिक व्यापारी दुकानदार यांच्या व्यवसायाचा विचार करुन श्रीविठ्लाचे मुखदर्शन संपुर्ण दिवसभरचालु ठेवण्याच्या मागणीसाठी हिंदुमहासभेच्या शिष्टमंडळाने आज मंदिराचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांची भेट घेतली या प्रसंगी अभयसिहं कुलकर्णी,बाळासाहेब डिंगरे,महेश खिस्ते,विवेक बेणारे,गणेश लंके आदी