पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार
 
                                पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन
पंढरपूर, दि.17, (उ. मा. का.) :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरी, कार्यकारी अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदिर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
 
                        
 Haribhau Prakshale
                                    Haribhau Prakshale                                

 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                 
                    
                
 
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
             
            
                                        
                                    