दहावी बोर्ड परीक्षेत आदिती लीगाडे यांचे ८९.६०% गुणांसह घवघवीत यश.*

महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर

*दहावी बोर्ड परीक्षेत आदिती लीगाडे यांचे ८९.६०% गुणांसह घवघवीत यश.

महाराष्ट्र राज्य एसएससी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावी एसएससी बोर्ड परीक्षांमध्ये मुलींनी कायमच बाजी मारलेली आहे त्यातच जुळे सोलापूर येथील स्वामी विवेकानंद प्रशालेतील कु. आदिती लीगाडे यांनी ८९.६०% गुण मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. 

स्वामी विवेकानंद प्रशालेची विद्यार्थिनी कु. आदिती लीगाडे यांनी दररोज शाळेतील शिक्षणासोबत ठराविक वेळेत न चुकता अभ्यासाचा व शिक्षकांचे योग्य मार्गदर्शनाने व आई-वडिलांच्या आशीर्वादाने मला ही यश संपादन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. तसेच यापुढे इंजिनिअरिंग आणि यूपीएससी करण्याचा मानस आहे.आई-वडिलांकडून कायमच शिक्षणात अग्रेसर राहण्याबाबत प्रोत्साहन मिळत होते. लहानपणापासूनच हुशार असलेल्या कु. आदिती लीगाडे यांनी ५०० पैकी ४४८ गुन प्राप्त केले आहे त्याबद्दल सर्वत्र आनंदाचे वातावरण असून आजी-आजोबा, मामा-मामी, काका पोलीस-काकू, सर्व मित्र परिवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.