इसबावी येथे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर
युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते
इसबावी येथे परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर
पंढरपूर शहरातील इसबावी येथे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त इसबावी येथिल पंढरपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधटराव मिञ परिवाराच्या वतीने येथिल राष्ट्रमाता जिजाऊ मंगल कार्यालय नवशक्ती चौक येथे सर्व रोग निदान आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराच्या सुरुवातीस माजी आमदार स्व सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पुजन युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या हस्ते करुन करण्यात आली यावेळी या शिबीरास पंढरपूर शहरातील तज्ञ डाॅक्टर उपस्थित होते तसेच या भागातील नागरिकांनी या शिबीरास मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला होता