चैत्री यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज

स्च्छतेसाठी शहराचे सहा विभाग; 1148 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

चैत्री यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज

चैत्री यात्रेसाठी पंढरपूर नगपालिका प्रशासन सज्ज

मुख्याधिकारी- अरविंद माळी

स्च्छतेसाठी शहराचे सहा विभाग; 1148 कर्मचाऱ्यांची नियुक्ती 

 पंढरपूर दि.31:- चैत्री शुद्ध एकादशी 02 एप्रिल रोजी असून, चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 4 ते 5 लाख भाविक येतात. यात्रा कालावधीत भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

चैत्री यात्रा कालावधीत स्वच्छतेसाठी मंदीर परिसर, संतपेठ, स्टेशन रोड, जुनी पेठ-गोविंद पुरा, नविपेठ-इसबावी, मनिषा नगर-इसबावी असे पंढरपूर शहराचे 6 विभाग केले असून, स्वच्छतेसाठी 1148 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये 348 कायम तर 800 हंगामी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे .तसेच शहरासह 65 एकर, वाळवंट, पत्राशेड, दर्शन रांग, नदी वाळवंट आदी ठिकाणी जंतनाशक फवारणीसह ,मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या ,कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी,टीपर आदी वाहनांच्या माध्यमातून दररोज सुमारे 55 ते 100 टन कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

              त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट 65 एकर परिसर, रेल्वे मैदान आदी ठिकाणी तात्पुरते 250 शौचालय उभारण्यात आली आहेत. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये म्हणून प्रतिबंधक पथकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटीसा देण्यात आल्या असून, वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी बॅरेकेटींग करण्यात आले आहेतअसल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मुख्याधिकारी श्री. माळी यांनी यावेळी केले आहे.