भंडीशेगांव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा संपन्न

भंडीशेगांव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा संपन्न

भंडीशेगांव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा संपन्न

भंडीशेगांव येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेची कार्यशाळा संपन्न

 पंढरपूर (ता.2) माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने परस्परांशी संपर्कासाठी नानाविध साधने बनवली व त्याचा वापर करून मानव प्रगती करत आहे. संपर्काची कधी नव्हती एवढी प्रचंड साधने आज जगात उपलब्ध आहेत त्याचा वापर करून गाव पातळीवर गावाची सुरक्षाव्यवस्था निर्माण करावी असे मत ग्राम सुरक्षा यंत्रणा चे जिल्हा समन्वयक विक्रमसिंह घाटगे यांनी यावेळी व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच विजय पाटील उपस्थित होते.

गावात होणाऱ्या चोऱ्या, दरोडा,आग लागणे,महिलांची छेडछाड,वाहन चोरी,गंभीर अपघात,वन्य प्राणी हल्ला अश्या अनेक घटनांमध्ये नागरिकांना त्वरित मदत मिळणे गरजेचे असते,आश्या सर्व घटनावर ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून मदत मिळू शकते अशी माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेचे वरीष्ठ विभागीय अधिकारी गणेश लोकरे यांनी दिली.

प्रत्येक गावात पोलीस स्टेशन कडून ग्राम सुरक्षा यंत्रांना सुरू करण्यात येत आहे, स्थानिक पोलीस ठाण्यात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील,तंटा मुक्त अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांना एकत्रित घेऊन ही यंत्रणा उभी केली जाते अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोदे, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार ढोबळे, एस. बी.माळी, ऐ.के.खर्चे,सरपंच मनीषा येलमार,उपसरपंच विजय पाटील,ग्रामसेवक जी.बी.नरसाळे,डॉ.श्रीधर येलमार,माजी सरपंच राजाभाऊ माने,संजय रणखांबे,संतोष ननवरे,भास्कर ननवरे,प्रकाश येलमार,सोमनाथ विभूते,अनिल जाधव,पोलीस पाटील शरद पाटील,सह ग्रामस्थ उपस्थिती होते.