गाळप हंगाम 2021-22 सांगता समारंभ
श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या कृपा आशीर्वादाने श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा चालू सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्वी
गाळप हंगाम 2021-22 सांगता समारं
श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांच्या कृपा आशीर्वादाने श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा चालू सन 2021-22 चा गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पडत 12 लाख 51 हजार मेट्रिक टन विक्रमी व रेकॉर्डब्रेक ऊसाचे गाळप करण्यात आले.
श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी लावलेल्या या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामुळे गेली अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या कुटुंबांमध्ये आर्थिक संपन्नता निर्माण झाली आहे.
सर्व शेतकरी बंधुंनी आपल्या कारखानावरती विश्वास टाकून आपल्या कारखान्याला खूप मोठ्या प्रमाणात ऊस दिला त्याबद्दल सर्व शेतकरी यांचे आभार आणि गळीत हंगामात सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचे योगदान खूप मोठे असते गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पाडल्याबद्दल एक महिन्याच्या पगार बक्षिस म्हणून देण्यात आला .
अशीच साथ सर्व ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूक ठेकेदार कर्मचारी यांनी इथून पुढील काळात साथ द्यावी अशी विनंती केली .
पुनश्च एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार.