लक्ष्मी दहिवडी येथील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल 

दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष डी के साखरे

लक्ष्मी दहिवडी येथील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल 

लक्ष्मी दहिवडी येथील मुख्याध्यापक व पर्यवेक्षकाविरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल 

       मंगळवेढा - विद्यामंदिर हायस्कूल लक्ष्मी दहिवडी तालुका मंगळवेढा या प्रशालेचे मुख्याध्यापक बाबासाहेब धोंडिबा रड्डी व पर्यवेक्षक बाळासाहेब रावसाहेब जुन्दळे यांच्या विरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायज्ञान्वये मंगळवेढा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की सिद्धेश्वर अर्जुन सोनवले हे सदर प्रशालेत नाईक पदावर कार्यरत असताना मयत झाले त्यांच्या जागेवरती अनुकंपा तत्वावर त्यांचा मुलगा अर्जुन सोनवले यांना शिक्षण अधिकारी यांच्या आदेशान्वये शिपाई पदावर सेवेत रुजू करून घेतले परंतू अर्जुन सोनवले हे शाळेत हजर असताना त्यांना सही करण्यासाठी मस्टर न देणे, खोट्या गैरहजेरीची नोंद करणे, त्यांना पगार न देणे तसेच त्यांनी दिलेले पत्र न स्वीकारणे व स्वीकारले तर त्याची पोच न देणे आदि कारणास्तव सोनवले यांना जातीय मानसिकतेतून त्रास दिल्याबद्दल दि 15 ऑगस्ट 2023 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.
         याअगोदर ही मुख्याध्यापक रड्डी यांचेविरुद्ध दि 10 नोव्हेंबर 2022 रोजी ऍट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
          दरम्यान सदरहू शाळेचे व्यवस्थापन शासनाच्या प्रचलित कायाद्यानुसार व नियमानुसार कामकाज करत नसल्याने सदर शाळेवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्याची मागणी दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे राज्य अध्यक्ष डी के साखरे यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक संपतराव सूर्यवंशी यांच्याकडे निवेदणाद्वारे केली असून त्याच्या प्रती शिक्षणमंत्री, शिक्षणसचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी (माध्यमिक )जि.प. सोलापूर यांना पाठवल्या आहेत.