आषाढी वारीच्या निमित्ताने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

पंढरपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित

आषाढी वारीच्या निमित्ताने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण.

*आषाढी वारीच्या निमित्ताने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण;* 

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती.

पढरपूर (ता.05) - आषाढ शुध्द एकादशीला म्हणजे दिनांक 17 जुलै रोजी आषाढी यात्रा संपन्न होत आहे. या दिवशी मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांची गर्दी असते. सदर यात्रा शांततेत व नियोजनबध्द पध्दतीने पार पाडणेकामी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने मंदिर समितीच्या कर्मचा-यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.आषाढी यात्रा 2024 निमित्त मोनिका सिंह-ठाकूर, अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर यांनी दिलेल्या सूचनेनुसार अग्निशमन, प्रथमोपचार, causality carrying method व safe evacuation बाबत दि. 2 व 5 जुलै रोजी श्री संत तुकाराम भवन, पंढरपूर येथे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.दि. 05 जुलैच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुस-या सत्राचे दिपप्रज्वलन मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये संभाजी कारले यांनी अग्निशमन, डॉ. अनिल काळे यांनी प्रथमोपचार तसेच बीमल नथवाणी, हनुमान चौधरी, किशोर आढळकर यांनी causality carrying method व safe evacuation बाबत प्रशिक्षण दिले.सदरचे प्रशिक्षण हे यात्रा कालावधीच्या दृष्टीने खुप उपयोगी होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमास मंदिर समितीकडील सुमारे 300 कर्मचारी / स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभाग प्रमुख विनोद पाटील यांनी केले व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख राजेश पिटले, सहायक विभाग प्रमुख राजकुमार कुलकर्णी, दादा नलवडे, भाऊसाहेब घोरपडे यांनी परिश्रम घेतले.