युटोपियन शुगर लि, पंतनगर कचरेवाडी ता मंगळवेढा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

ऊस तोडणी यंत्रे कारखाना कार्यस्थळावर उतरून विधिवत पूजा

युटोपियन शुगर लि, पंतनगर कचरेवाडी ता मंगळवेढा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

युटोपियन शुगर लि, पंतनगर कचरेवाडी ता मंगळवेढा यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !!

मंगळवेढा दि .28.मे  गतवर्षी राज्यात तोडणी मजुराअभावी अनेक कारखान्यांना फटका बसून त्याचा एकंदरीत गळीतावर मोठा परिणाम झाला होता, शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्याला गळीतास पाठविण्यासाठी वाहनमालक, मुकादम यांना मोठ्या प्रमाणात पैसे द्यावे लागले होते आणि याची थोडीफार झळ आपल्या कारखान्याला देखील बसली होती. या गोष्टीची जाणीव ठेऊन आपल्या कारखान्याच्या ऊस उत्पादक सभासद, शेतकरी यांचा नियमानुसार सुलभरीत्या ऊस गळीतास येण्यासाठी श्री पांडुरंग सह सा कारखान्याचे चेअरमन मा आ प्रशांत परिचारक मालक व युटोपीयन शुगर, पंतनगर कचरेवाडी चे चेअरमन मा उमेश परिचारक मालक यांच्या मार्गदर्शना खाली कारखाना मालकीच्या ऊस तोडणी मशीन घेण्याचा निर्णय व्यवस्थापकीय संचालक मा रोहन परिचारक मालकांनी घेतला. आज ही सर्व ऊस तोडणी यंत्रे कारखाना कार्यस्थळावर उतरून विधिवत पूजा करण्यात आली या वेळी उपस्थित आपले मार्गदर्शक मा उमेश परिचारक मालक, पंढरपूर अर्बन बॅंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा विरधे सो, युटोपीयन कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मा रोहन परिचारक मालक,स्टेट बँक ऑफ इंडिया पंढरपूर शाखेचे शाखा प्रबंधक मा श्री लोखंडे सो व इतर बँक कर्मचारी, ऊस तोडणी यंत्र कंपनीचे प्रतिनिधी श्री येलपाले सो , मुख्य शेती अधिकारी श्री व्यवहारे सो, वाहनमालक व इतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.