रॅगिंग हे अमानवी कृत्य : न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये कायदेविषयक शिबीर संपन्न

रॅगिंग हे अमानवी कृत्य : न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे

*रॅगिंग हे अमानवी कृत्य : न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे*

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये कायदेविषयक शिबीर संपन्न

पंढरपूर/प्रतिनिधीः कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्याला शारिरीक किंवा मानसिक हानी पोहोचवणे, त्याच्यात धास्ती, भयाची किंवा अडचणीची भावना निर्माण करणे, कोणत्याही स्वरुपात चिडवणे, शिवीगाळ करणे, मारहाण, धमकी देणे, खोड्या काढणे किंवा मनाला टोचेल असे बोलणे याला रॅगिंग संबोधण्यात येतं परंतु हे रॅगींग अमानवी कृत्य आहे असे प्रतिपादन न्यायाधीश श्रीमती एस. ए. साळुंखे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे कायदेविषयक शिबीरादरम्यान करण्यात आले. 

 किमान समान शिबीरा अंतर्गत मंगळवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२३ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय येथे मा. सलमान आझमी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर, श्री. नरेंद्र जोशी, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर व मा. श्री. एम. बी. लंबे, जिल्हा न्यायाधीश, पंढरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. श्रीमती एस. ए. साळुंखे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, पंढरपूर यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

  पुढे बोलताना न्यायाधीश साळुंखे मॅडम म्हणाले की, प्रामुख्याने रॅगींग हे तू असा दिसतो!, तू या गावचा! तसेच सिनिअर्स हे त्यांचा अभ्यास, प्रॅक्टीक करुन देणेसाठी रॅगिंग करतात. कॉलेजमध्ये प्रवेश घेते वेळेस अॅन्टीरॅगिंगचा फाॅर्म भरुन त्याचा अवलंब केला पाहिजे. महाविद्यालयीन मुलांमध्ये जास्त आत्महत्या करण्याचे कारण हे रॅगिंग आहे. जो कोणी, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या, कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या आत किंवा बाहेर रॅगिंगला प्रोत्साहन देतो किंवा त्यात सहभागी होतो किंवा त्याचा प्रचार करतो, त्याला दोषी आढळल्यास, दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची किंवा दंडाची शिक्षा दिली जाते याची कायद्यामध्ये तरतुद केलेली आहे. रॅगिंग होत असेल तर यु.जी.सी. च्या अधिकृत संकेतस्थळावर त्याबाबत तक्रार नोंदवली पाहिजे संकेतस्थळावर ई-मेल व हेल्पलाईन क्रमांक देणेत आलेला आहे. 

 सदर शिबीरादरम्यान महाविद्यालयीन मुलांना पंढरपूर पोलीस ठाणेकडुन वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार श्री. धनंजय जाधव यांनी वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन करुन वाहन चालवत असताना घ्यावयाची काळजी व नवीन नियमांबाबत मुलांना माहिती देण्यात आली. शहर पोलीस ठाणेकडुन सहा. पोलीस निरीक्षक कपिल सोनकांबळे, पोलीस हवालदार प्रविणकुमार सोनवले उपस्थित होते. 

 शिबीराची प्रस्तावना पंढरपूर अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. शशिकांत घाडगे यांनी केली, तदनंतर कार्यक्रमा दरम्यान अॅड.शितल आसबे, अॅड. रोहित फावडे यांनी भाषण केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंढरपूर अधिवक्ता संघाचे सचिव श्री. राहुल बोडके व महाविद्यालयाचे सहशिक्षक श्री.शिवशरण यांनी केले. 

 सदर शिबीरास महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. शितोळे उपस्थित होते. पंढरपूर अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष अॅड. शशिकांत घाडगे, सचिव राहुल बोडके, सह सचिव अॅड.शक्तीमान माने, सदस्या अॅड.शितल आसबे, अॅड.रोहित फावडे, अॅड.केतन चव्हाण, अड.सुवर्णा आवघडे, विधी स्वयंसेवक श्री. सुनिल यारगट्टीकर, श्री. शंकर ऐतवाडकर, अॅड. अंकुश वाघमारे तसेच न्यायालयीन कर्मचारी श्री. के. के. शेख, श्री. विशाल ढोबळे, श्री. विवेक कणकी, श्री. किरण घोरपडे, श्री. उज्वल साळुंखे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.