सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को ऑफ फेडरेशनच्या वतीने मजूर संस्थेचे सभासदाना वस्तू भेट.

जिल्हा परिषदे कडील विकास कामे सहकार मजूर संस्थेला मिळाली पाहिजेत

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को ऑफ फेडरेशनच्या वतीने मजूर संस्थेचे सभासदाना वस्तू भेट.
सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को ऑफ फेडरेशनच्या वतीने मजूर संस्थेचे सभासदाना वस्तू भेट.

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को ऑफ फेडरेशनच्या वतीने मजूर संस्थेचे सभासदाना वस्तू भेट.

पंढरपूर सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को. ऑफ. फेडरेशनच्या वतीने पहिल्यांदाच पंढरपूर तालुक्यातील सहकारी मजूर संस्थेच्या सभासदांना बोनस म्हणून भेट वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज फेडरेशनच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे अध्यक्ष श्री शंकर चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. नूतन वर्षानिमित्त आज बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील सभागृहामध्ये पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचे व सर्वांचे नेते युटोपीयन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांच्या शुभहस्ते सहकारी मजूर संस्थांच्या सभासदांना चांगल्या प्रतीच्या सतरंजीचे वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान युटोपीयन शुगरचे चेअरमन मा. उमेश परिचारक होते अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना उमेश परिचारक म्हणाले की शासनाने सध्या सर्व विकास कामे ऑनलाइन केली आहेत. को-ऑपरेटिव सहकारला भरपूर अधिकार आहेत तेव्हा लेबर फेडरेशन साठी आपण सरकारला कामा संदर्भात मागणी निवेदन माजी आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे यांच्या पुढाकाराने ते आपण प्रश्न मार्गी लावू. सरकार आपले आहे बहुमताचे सरकार आहे. आपण सहकारी मजूर संस्था व सुभेअभियंता यांची कामे पाहत आहोत सध्या पंढरपूर वाखरी रोडचे काम 27% बिलु भरले आहे ते त्या ठेकेदार यास हे काम कसे परवडणार त्याचबरोबर जिल्हा परिषदे कडील विकास कामे सहकार मजूर संस्थेला मिळाली पाहिजेत असे सोलापूर जिल्हा डिस्ट्रिक्ट लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले यावर उमेश परिचारक यांनी मजूर संस्थाना कामे मिळायला पाहिजेत यासाठी आपण माजी आ. प्रशांत परिचारक व आ. समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भेटून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करूया असे म्हणाले.

सोलापूर जिल्हा लेबर डिस्ट्रिक्ट फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले म्हणले की लेबर फेडरेशनला मजूर संस्थेचे सभासद दरवर्षी 1% वर्गणी देत असतात त्या वर्गणीच्या पोटी आज पर्यंत लेबर फेडरेशन कडे 80 लाख रुपये जमा आहेत त्यापैकी 50 लाखाची एफडी केली आहे त्यामुळेच आज या ठिकाणी मी सभासदांना चांगल्या प्रतीची सतरंजी वाटण्याचा कार्यक्रम घेत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सहकारी मजूर संस्थांना जिल्हा परिषदेकडे विकास कामे देण्यात यावी यासाठी आपण जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा करावा मजूर संस्थे कडून चांगली कामे केली जात असतात तेव्हा जिल्हा परिषदेकडून यापुढे संस्थांना कामे देण्यात यावीत असे लेबर फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले यांनी करताना सांगितले.सदर कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष दादा गायकवाड, उपसभापती राजू बापू गावडे , महादेव बागल, कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन कैलास खुळे सर , संचालक वसंत क्षीरसागर , संचालक बाळासाहेब बागल संचालक तानाजीराव वाघमोडे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी जलसंधारण अधिकारी पंडितराव भोसले , कार्यक्रमाच्या शेवटी संजय साळुंखे यांनी आभार मानले या कार्यक्रमास जिल्हा फेडरेशनचे संचालक व मजूर संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.