श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील तर वायरस चेअरमन सौ. प्रेम लता रोंगे यांची बिनविरोध निवड.

तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नुकतीच निवडणूक पार पडली

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील तर वायरस चेअरमन सौ. प्रेम लता रोंगे यांची बिनविरोध निवड.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील तर वायरस चेअरमन सौ. प्रेम लता रोंगे यांची बिनविरोध निवड

पंढरपूर दि. 20 जुलै पंढरपूर.. तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे नुकतीच निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत डी व्ही पी उद्योग समूहाचे अभिजीत पाटील यांनी1400 मताची आघाडी घेऊन भालके -काळे आणि युवराज पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव केला आहे.

आज गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड होती . या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी श्री नागेश पाटील यांच्या उपस्थित ही निवड पार पडली आहे. 

यावेळी नूतन चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की ऊस शेतकरी सभासद ऊस वाहतूक ठेकेदार या सर्वांची मागील देणे देणार आहोत .

असून कारखाना येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू करणार आहे.या वर्षी किमान 12लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मी आज चेअरमन पदाची सूत्रे हातात घेतली असून यापुढे शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन अडीच हजार रुपये एवढा भाव देणार आहे. हा कारखाना शेतकरी सभासदांचा साखर कारखाना आहे मी त्यांच्यासाठीच चांगले काम करणार असून योग्य ते निर्णय घेणार असल्याचे सांगितले. तर व्हाईस चेअरमन सौ प्रेम लता रोंगे यांनी सांगितले की महिला शेतकरी सभासदासाठी यापुढे विशेष योजना राबवणार आहोत. 45 वर्षाच्या साखर कारखानदारी मध्ये पहिल्यांदाच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी एका महिलेला संधी दिल्यामुळे सोलापूर जिल्हयात व पंढरपूर तालुक्यांमध्ये सर्व नूतन संचालक आणि चेअरमन अभिजीत पाटील यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले जात आहे.