भटुंबरे विसावा शिवारात शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून जगीच मृत्यू.

जखमी महिलांवर पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

भटुंबरे विसावा शिवारात शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून जगीच मृत्यू.

भटुंबरे विसावा शिवारात शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून जगीच मृत्यू.

दोन महिला गंभीर जखमी.

पंढरपूर शहरा लगत विखे पाटील यांच्या मठा जवळ स्वत.च्या शेतामध्ये कडवळ ज्वारीला पाणी देण्यासाठी शेतात गेली असता अंगावर वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर जवळच विट भट्टीवर मोल मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असणाऱ्या दोन महिला जनावरांसाठी चारा गवतआणण्यासाठी गेल्या होत्या या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांच्येवर पंढरपूर उप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव शारदा कल्याण कुंभार वय वर्ष 45 असून त्याच्या कुटुंबात पती व चार मुली एक मुलगा आहे. दोन मुली विवाहित तर दोन अविवाहित मुली तसेच मुलगा 8वर्षाचा आहे.सदर घटनेत यावेळी बाळाबाई रतन वाघमारे वय वर्ष 35 व लक्ष्मी विठ्ठल आडगळे वय वर्ष 30 या दोघी जखमी झाल्या आहेत.शेतात पिकाला पाणी देत असताना आज रविवार सायंकाळी 5/30 ते 6वाजनेच्या दरम्यान अचानक वारा पाऊस सुरू झाला असल्याने शेताच्या बांधावर असणारे लिंबाचे झाड त्याचा आडोसा घेऊन बसल्या होत्या . परंतु भयानक विजाचा कडकडाट व मुसळधार पावस सुरू झाल्याने अचानक वीज झाडावर पडली आणि यामध्ये शारदा कल्याण कुंभार ह्या भाजल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील व गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली आणि तत्काळ उपचारासाठी पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरानी मृत घोषीत केले.