अहमदनगर येथे होणार 61 वे मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन.

मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष प्राचार्य सुभाषराव माने सर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक संपन्न

अहमदनगर येथे होणार 61 वे मुख्याध्यापक महामंडळाचे अधिवेशन.

पुणे दिनांक 17/ 10 /2022 वार- सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ पुणे येथील महामंडळाच्या कार्यालयात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ मुंबईच्या दिनांक ६नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर २०२२ रोजी अहमदनगर येथे होणाऱ्या 61 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. महेंद्र मधुकर गणपुले सर पुणे यांचे महाराष्ट्राचे मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक सन्माननीय सुभाषराव माने सर यांच्या अध्यक्षतेखाली एकमुखाने निवड करण्यात आली. त्यावेळी राज्याचे अध्यक्ष सन्माननीय जे.के पाटील सर, सचिव शांताराम पोखरकर सर, माजी अध्यक्ष अरुणजी थोरात सर, सन्माननीय आदिनाथ थोरात सर, सन्माननीय शिवाजीराव किलकिले सर, सन्माननीय रंगसिद्ध दसाडे सर व अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मा.श्री. महेंद्र गणपुले सर यांचा अधिवेशनअध्यक्ष म्हणून इथोच्छ सत्कार करण्यात आला व मा. प्रा. सुभाषराव माने सर यांनी त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.