कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

कार्तिक यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी

रस्त्यावरील खड्डे बुजविणे व स्वच्छतेला प्राधान्य

प्रांताधिकारी- गजानन गुरव

पंढरपूर (दि.20):- कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. दिनांक 4 नाव्हेंबर 2022 रोजी कार्तिकी एकादशी असून यात्रेचा कालावधी 26 ऑक्टोंबर ते 8 नोव्हेंबर 2022 आहे. परतीच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरातील तसेच शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर खड्डे पडले असल्याने प्राधान्याने खड्डे बुजवून स्वच्छता करावी. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांची कोणतेही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व संबधित विभागाने घ्यावी अशा, सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.

कार्तिकी यात्रा कालावधीत भाविकांच्या सोयी-सुविधासाठी प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर बैठक घेण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरिक्षक धनंजय जाधव, मिलींद पाटील, अरुण फुगे, मंदीर समितीचे लेखाधिकारी अनिल पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप केचे, पशुसंवर्धनचे सहा.आयुक्त डॉ.भिंगारे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रांताधिकारी म्हणाले, यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा, परतीच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी साठल्यामुळे डासांची उत्पती वाढण्याची शक्यता असल्याने तात्काळ फवारणी करुन घ्यावी. चंद्रभागा वाळवंटात पुरेशा प्रकाश राहिल याबाबत नियोजन करावे,धोकादायक इमारतींवर ठळक सूचना फलक लावावेत. अनाधिकृत फलक काढावेत.मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. मंदीर समितीने व नगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग, नदीपात्रात आवश्यक ठिकाणी बॅरकेंटींग करावे व अग्निशामक यंत्रणा कार्यरत ठेवावी .

आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे.कार्तिकी यात्रा कालावधीत मंदीर समितीने जादाचे पत्राशेड उभारावेत, दर्शन रांगेत ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत. दर्शनरांगेत व दर्शन मंडपात भाविकांना स्वच्छ पिण्याच्या व्यवस्था करावी. मंदीरात तसेच मंदीराभेवती करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईचे फायर ऑडीट करुन घ्यावे. तालुक्यात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने शहरातील मोकाट जनावरांचेही लसीकरण करुन घ्यावे. यासाठी नगरपालिकेने सर्व मोकाट जनावरे एकाच ठिकाणी येतील याबाबत नियोजन करावे. अन्न. व औषध प्रशासनाने अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.

यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी तसेच भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. शहरातील पार्कीग ठिकाणची लेव्हलिंग करुन झाडे-झुडपे काढावेत तसेच प्रकाश व्यवस्था करावी.मंदीर व मंदीर परिसरात फिरत्या विक्रेत्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविकांना त्रास होतो यासाठी जादा हॉकर्स पथकाची नेमणूक करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. पावसामुळे शहरात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरु असून, स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच शहरात वेळोवेळी जंतनाशक फवारणी करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.