मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली शरद पवारांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार सह्याद्रीवर एकत्र आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली शरद पवारांची भेट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतली शरद पवारांची भेट

पवार व शिंदे भेटीत विधानसभेवर बंद दाराआड चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरद पवार सह्याद्रीवर एकत्र आले.

विधानसभेचे डावपेच आखले.

राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला संघर्ष मिटावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी भेट घेतली असल्याचे दिसत असले, तरी बंद दरवाजाआड बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत या दोन नेत्यांमध्ये गुफ्तगू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या दोघांच्या चर्चेत विधानसभा निवडणुकीची किनार होती. मराठा-ओबीसी संघर्षात विधानसभेसाठी लोकसभेप्रमाणेच काही गुप्त समझोतेही या दोन नेत्यांमध्ये चर्चेत आले असू शकतात.

गेल्या लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभ शिंदे गट आणि शरद पवार गटाला झाला होता. भाजपच्या मराठवाड्यातल्या सगळ्या जागा पडल्या असताना शिंदे गटाची संभाजीनगरची जागा जरांगेंच्या पाठिंब्यामुळे निवडून आली, हे लपून राहिलेले नाही. लोकसभेला दहापैकी आठ खासदार निवडून आणताना पवार गटही जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभार्थी ठरला. त्यामुळे मराठा-ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार ‘सह्याद्री’वर एकत्र आले आणि त्यानिमित्ताने उभयतांत विधानसभेचे डावपेचही आखले गेले

सोमवारी झालेल्या पवार-शिंदे यांच्या बैठकीत जरांगे यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेता येईल, याबाबत शिंदे यांना पवारांनी मार्गदर्शन केले. महायुतीत शिंदेंकडे, तर महाविकास आघाडीत शरद पवार यांच्याकडे मराठा समाज काही प्रमाणात झुकला असल्याचे चित्र आहे. शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा शरद पवार यांनी त्यांचे खास अभिनंदन केले होते. गेल्या दोन वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कधीही थेट टीका केलेली नाही. त्यातच दोघांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विरोधक अजित पवार गट असल्याने या दोन नेत्यांमध्ये त्यासंदर्भात खास चर्चा झाल्याचे सांगितले जाते.