पंढरीत 27 वर्षीय विवाहित महिलेने सावकारकीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या.

पंढरीची सावकार आणखी किती बळी घेणार

पंढरीत 27 वर्षीय विवाहित महिलेने सावकारकीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या.

पंढरीत 27 वर्षीय विवाहित महिलेने सावकारकीच्या जाचाला कंटाळून केली आत्महत्या.

पंढरपूर दिनांक 17 नोव्हेंबर पंढरपूर शहरातील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत राहणाऱ्या 27 वर्षाच्या विवाहित महिलेने सावकारकीच्या जाचाला कंटाळून आज सायंकाळी साडेचार ते पाच च्या दरम्यान राहत्या घरामध्ये लाकडीवाशाला साडी बांधून गळफास घेतला आहे.

मयत कोमल विशाल पवार वय वर्ष 27 असे असून ती ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी मध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती ज्ञानेश्वर झोपडपट्टीतीलच एक सावकारकी करणाऱ्या महिलेने आज दुपारी पैसे देवाण-घेवाण वरून मयत कोमल हीस अपमानस्पद बोलून शिवीगाळ केली असल्याकची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे. सावकार की करणाऱ्या त्या महिलेचा नेहमीच कोमल व तिच्या कुटुंबाला त्रास होत असल्याने अखेर कोमल हिने स्वतःच्या पत्र्याच्या घरामध्येच लाकडी वाशाला साडी बांधून गळफास घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर कोमल हिस औषधोपचार करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत असल्याचे घोषित केले आहे. मयत कोमल हिच्या पश्चात पती विशाल सासू आणि दोन मुली एक मुलगा आहे .सदर घटनेची माहिती पंढरपूर शहर पोलिसांना मिळताच शहर पोलिसांची पुढील कारवाई सुरू असल्याचे समजते.