दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे

३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन २५ ते २८ रुपयापर्यंत खाली आला

दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे

दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे

 पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये दुग्ध व्यवसाय हा महत्वपूर्ण उपजीविकेचा व्यवसाय आहे. दोन महिन्यांपूर्वी ३.५/८.५ गुणवत्तेला ३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन २५ ते २८ रुपयापर्यंत खाली आला आहे.त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून उत्पादन खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तरी शासनाने ठरवून दिलेला किमान ३४रुपये इतका दर दूध उत्पादकांना देण्यात यावा अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी महसूल पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे कडे केली आहे.

मंत्री ना.विखे पाटील यांना दिलेल्या पत्रामध्ये आवताडे यांनी म्हटले आहे की, सध्या पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतीकडून कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे उपजीविकेसाठी ते दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत मात्र चाऱ्याचे वाढलेले दर पशुखाद्याचे वाढलेले दर पाहता प्रति लिटर उत्पादन खर्च ३५ रुपयापर्यंत जात आहे आणि हाती दर २५ते २८ रुपये मिळत असल्यामुळे मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

शासनाने नेमलेल्या दूध दर समितीने ३४ रुपये दर जाहीर करून सुद्धा खाजगी दूध संघ हा दर देण्यामध्ये असमर्थता दाखवत आहेत.तरी आपण लक्ष घालून समितीची पुन्हा बैठक लावावी व तात्काळ दूध दराविषयीचा तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा आशयाचे पत्र देत आवताडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे दूधदर वाढवण्यासंदर्भात मागणी केलेली आहे.