पंढरपूर शहरात डेंगू साथ आजाराचे थैमान.

नगर परिषदेच्या अकाउंटंट विभागातील कर्मचाऱ्यास डेंगूची सदृश्य लागण

पंढरपूर शहरात डेंगू साथ आजाराचे थैमान.

पंढरपूर शहरात डेंगू साथ आजाराचे थैमान

नगर परिषदेच्या अकाउंटंट विभागातील कर्मचाऱ्यास डेंगूची सदृश्य लागण

डेंगू साथीचा आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा अन्यथा डेंगू आजाराने दगावल्यास पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्यावर कलम 302 चा गुन्हा दाखल करणार.

 पंढरपूर गुरुवार दि. 22 सप्टेंबर गेल्या तीन महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक जास्त पाऊस झाल्याने पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यामध्ये सध्या डेंगू साथीच्या आजाराचे थैमान माजले आहे. परंतु पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी पंढरपूर परिसरातील अनेक जणांना डेंगू सदृश्य लागण झाली असून लहान मुलांसह प्रौढ व्यक्तीना ही डेंगूची मोठ्या प्रमाणात लागण झाली . एवढेच नव्हे तर खुद्द पंढरपूर नगर परिषदेच्या अकाउंट विभागाच्या कर्मचारी व्यक्तीलाही डेंगूस लागण झाली असल्याची चर्चा नगरपरिषद कर्मचारी व शहरांमध्ये सुरू आहे. डेंगू साथीच्या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी तत्काळ उपायोजना कराव्यात. 

सध्या सोलापूर येथे पंढरपूर शहरातील अनेक लहान मुले व महिला पुरुष डेंगू वरती उपचार सुरू आहेत. सतत पाऊस झाल्याने शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने डेंगू डासाचे प्रमाण अधिक वाढले आहे. नगर परिषदेचे सत्ताधारी व मुख्याधिकारी शासकीय प्रशासक या सर्वांनी जणू झोपेचे सोंग घेतले आहे म्हणावे का डोळ्यावर काळी पट्टी बांधली आहे असे सध्या शहरामध्ये जानकर व्यक्तींच्या तोंडून बोलले जात आहे.

पंढरपूर शहरातील कोणीही व्यक्ती रुग्ण डेंगू आजार साथीने दगावल्यास पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना जबाबदार धरले जाऊन त्यांच्यावर डेंगू झालेल्या रुग्णाच्या मृत्यू कारणीभूत ठरवून मनुष्यवधाचा नियमानुसार 302 चा गुन्हा दाखल करणार असल्याचे एका संघटनेच्या पदाधिकारी यांनी साई सम्राट न्युजशी बोलताना सांगितले.

 पंढरपूर येथील लहान मुलांना व महिला पुरुषांना डेंगू प्रदूषण लागण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील महिला पोलिसाचा मृत्यू डेंगू सदृश्य आजाराने झाल्याचे वृत्त सोशल मीडिया व प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पंढरपूर नगरपरिषद प्रशासनाने पंढरपूर शहरातील मोठ्या झोपडपट्टी भागामध्ये डासाची फवारणी तत्काळ करणे गरजेचे असतानाही मुख्याधिकाऱ्यांचे मात्र याकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.पावसाळ्यात किमान पंधरा दिवसाला दास प्रतिबंधक नको उपाय म्हणून फवारणी करणे गरजेचे आहे परंतु पंढरपूर नगर परिषदेने मात्र तीन महिन्यांमध्ये एकदाच डास प्रतिबंधक म्हणून केमिकल धुराची फवारणी केली आहे. पंढरपूर नगर परिषदेने तात्काळ डेंगू साथीतीचा आजार रोखण्यासाठी तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अन्यथा नगर परिषदेवर मोर्चा आंदोलने केली जातील असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.