महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी करणार मुंबई येथे 30 सप्टेंबर पासून अमर उपोषण

राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्रित करून राज्य संघर्ष समितीची स्थापना

महाराष्ट्रातील नगरपंचायत व नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी करणार मुंबई येथे 30 सप्टेंबर पासून अमर उपोषण

महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने नगर पालिका कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांबाबत 30 ऑक्टोंबर रोजी संचालक कार्यालय बेलापूर नवी मुंबई येथे आमरण उपोषण - अँड.सुनिल वाळूजकर

महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यासाठी 30 ऑक्टोंबर २०२३ रोजी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय राज्य संघर्ष समितीने घेतलेला आहे यासाठी राज्यातील सर्व कामगार संघटना एकत्रित करून राज्य संघर्ष समितीची स्थापना करण्यात आलेली आहे.

 महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व सर्व सचिवांसह मीटिंग झाली होती या मीटिंगमध्ये अनेक निर्णय होऊन सुद्धा अध्याप पर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे मा आयुकत तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय नवी मुंबई यांचे कार्यालया समोर पाच हजार नगरपरिषद कर्मचाऱ्यांसह बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय राज्याचे कामगार नेते डॉ.डी एल कराड, अँड. सुरेश ठाकूर, डी.पी शिंदे, रामगोपाल मिश्रा, संतोष पवार, अनिल जाधव, अँड.सुनिल वाळूजकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला आहे 

यावेळी बोलताना राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की,महाराष्ट्रातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत बाबत औरंगाबाद खंडपीठ यांनी जो स्थगिती आदेश दिला आहे तो उठवण्यासाठी शासनावर दबाव टाकण्यासाठी व शासना तर्फे चांगला विधीज्ञ नेमून लवकरात लवकर स्थगिती आदेश उठवून महाराष्ट्रातल्या बौद्ध मातंग व इतर सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्काने नियुक्ती देणे आवश्यक आहे, महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांना वेतन अनुदान प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नगरपालिकांना मिळावे, नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांना व सफाई कर्मचारी यांना विना शर्त विना अट कोणतेही शैक्षणिक अहार्ता अट न घालता समावेशन करावे व सफाई कर्मचारी यांची आकृतिबंधा मध्ये पदे निर्माण करून त्यांना विना शर्त विना अट सेवेत कायम करावे व सेवेत असताना मयत झाल्यास अनुकंपा व वारसा हक्क योजना लागू करावी, स्वच्छता व आरोग्य निरीक्षक यांचे विकल्प त्वरित मागवून त्वरित त्यांचे समावेशन करावे, तसेच कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे व सेवेत कायम होईपर्यंत समान काम समान वेतन प्रमाणे किमान वेतन देण्यात यावे तसेच गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेली अनुकंपा ची सर्व पदे त्वरित भरावीत, नगरपरिषदेमधील सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांना वरिष्ठ पदोन्नती मिळावी व १२ वर्ष व २४ वर्षाची आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा तसेच १०,२०,३० ची आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत त्वरित आदेश निर्गमित करावेत , सेवानिवृत्त झालेल्या सर्व सफाई व इतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे उपदान व रजा वेतन वेतन हे त्वरित मिळावे, महाराष्ट्रातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत मोफत घरे त्वरित देण्यात यावीत, संवर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या समुपदेशन द्वारे करावे गैरसोयीच्या बदल्या टाळाव्यात तसेच सर्व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या त्वरित कराव्यात व इतर सर्व मागण्यासाठी बेमुदत आमरण उपोषण आंदोलन करण्यात येत असून या आमरण उपोषण आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील पाच हजार नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी नवी मुंबई येथील संचालक कार्यालया समोर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड. सुनील वाळूजकर यांनी दिली