स्व. सिंधुताई सपकाळ *माईंच्या नऊ लेकींच्या विवाह सोहळ्यासाठी लामा फेरा फाऊंडेशन' तर्फे स्व.
लामा फेरा फाऊंडेशन' तर्फे लाखाची मदत
स्व. सिंधुताई सपकाळ *माईंच्या नऊ लेकींच्या विवाह सोहळ्यासाठी लामा फेरा फाऊंडेशन' तर्फे
स्व.सिंधुताई सपकाळ *माईंच्या नऊ लेकींच्या विवाह सोहळ्यासाठी लामा फेरा फाऊंडेशन' तर्फे लाखाची मदत*
पुणे, १२ मे २०२२: 'आत्महत्या मुक्त भारत' या प्रमुख उद्देशावर काम करत असलेले पुण्यातील नामांकित लामा फेरा इंटरनॅशनल रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरच्या 'लामा फेरा फाऊंडेशन'च्या वतीने बुधवार दिनांक ११ मे २०२२ रोजी स्व. सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या ममता बाल सदन (बालगृह), सासवड,पुणे या संस्थेतील नऊ(९) मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत म्हणून रूपये एक लाख एक रूपाचा धनादेश देण्यात आला. हा विवाह सोहळा रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी, दुपारी १२ वा. ३१मी., लक्ष्मी लॉन्स, मगरपट्टा सिटी हडपसर येथे आयोजित करण्यात आला आहे.
धनादेश सुपूर्त करतांना लामा फेरा इंटरनॅशनल रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष लामा डॉ. सत्येंद्र शुक्ला, सौ. श्वेता शुक्ला, रेवती दामोदरे, यंगेस्ट लामा हिलर कु. सारा सत्येंद्र शुक्ला, कु. रिया शुक्ला यांच्या सह धनादेश स्वीकारण्याकरीता ममता बाल सदन (बालगृह) चे दिपकदादा गायकवाड आणि सौ. स्मिताताई उपस्थित होते.
डॉ. सत्येंद्र शुक्ला म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो या सदभावनातून 'लामा फेरा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही नेहमीच अनेक समाजातील विविध घटकांसाठी काम करत असतो. अनाथ मुलांसाठी, वृद्धीसाठी, बेघर नागरिक, गरजू विद्यार्थ्यांना सोबतच गो रक्षण, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड व संगोपन, अन्नदान आदि अनेक काम करत असते. त्याच क्रमांत आज ममता बाल सदन (बालगृह) या संस्थेचे काम पाहून संस्थेतील मुलींच्या नविन वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी त्यांच्या विवाह सोहळ्यात आर्थिक स्वरूपात एक लाख रुपयेची मदत करून छोटेसे सहकार्य आम्ही करत आहोत.
दिपकदादा गायकवाड म्हणाले, समाजात डॉ. सत्येंद्र शुक्ला व्यक्तींसारखे लोक आहेत त्याचमुळे खरतर अशा आश्रमांचे काम व्यवस्थीत व सुरळीत चालू राहते. डॉ शुक्ला नेहमीच आमच्या मुलांना सहकार्यसोबत मार्गदर्शन देखील करतात. त्यांचा मोठा आधार आमच्या ममता बाल सदन संस्थेला आहे असे म्हणत यांनी लामा फेराचे सर्व पदाधिकारी यांच्यासह डॉ. सत्येंद्र शुक्ला यांचे आभार मानले. तसेच या विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे त्यामुळे दातार व्यक्तींना त्यांनी मदतचे आवाहन देखील यावेळी केले.
लाखाची मदत*