पंढरीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अधिकारी सदस्य पत्रकारांचा सन्मान
पंढरीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम. संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम मंदिर समिती व पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली गेली अडीच महिन्यापासून सुरू केले होते तेव्हापासून पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते या कालावधीत फक्त पहाटे 5/30 ते सकाळी 10:45 पर्यंत मुखदर्शन ठेवण्यात आले होते. सध्या पहिल्या टप्प्यात मंदिरातील गाभाऱ्याचे काम झाले असून उर्वरित सभा मंडप व इतर राहिलेली कामे ही सुरू असून तेही लवकरच पूर्ण होतील असे मंदिर समितीचे अध्यक्ष ह भ प औसेकर महाराज यांनी सांगितले.
सध्या पंढरपूरची आषाढी एकादशी सोहळा जवळ आला असल्याने दोन जून रोजी मंदिर समितीने एक बैठक घेऊन सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आ प्रशांतराव परिचारक आ. समाधान अवताडे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासह दोन जून रोजी पंढरपूर व पुणे येथील पत्रकारांनाही आमंत्रित केले होते. पहाटे चार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा करून श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन भाविक भक्तांसाठी 2 जून रोजी सुरू करण्यात आले आहे. हीच संधी साधत पुणे येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी किरण जोशी यांनी पंढरपूर येथील तुकाराम भवन मध्ये मंदिर समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करताना पंढरपुरातील पत्रकारांनी इलेक्ट्रॉन मीडिया व त्या प्रिंट मीडिया यांनी मंदिराच्या कामावर इतर बाबतीत वृत्तांकन चांगले केल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने किरण जोशी यांनी पंढरपुरातील पत्रकारांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ प्रतापसिंह जाधव हे होते .
याप्रसंगी संपादक पद्मश्री डॉक्टर प्रताप शिव जाधव यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व अधिकारी सदस्य तसेच पंढरपूर येथील पत्रकारांचा ही सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी किरण जोशी यांनी ही एक संधी साधून पंढरपूर येथील तुकाराम भवन मध्ये मंदिर समिती व पत्रकारांचा सन्मान सोहळा घेतल्याने पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रताप सिंह जाधव यांनी महाराष्ट्र मराठी पत्रकार पत्रकार संघाने हा एक स्तुत्य उपक्रम घेतला आहे असे उद्गार आपल्या अध्यक्ष भाषणातून उद्गार काढले