भाजप व मित्र पक्षाचे राज्यात ४५ तर देशात चारशे जागा 400 पार करणार. दानवे.

उद्या संघालाही डुप्लिकेट म्हणतील यावर दानवे

भाजप व मित्र पक्षाचे राज्यात ४५ तर देशात चारशे जागा 400 पार करणार.  दानवे.

भाजप व मित्र पक्षाचे राज्यात ४५ तर देशात चारशे जागा येणार - रावसाहेब दानवे

पंढरपूर दी. १९ मे. केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी बोलताना ते म्हणाले राज्यात भाजप व मित्र पक्षांच्या ४५ जागा येणार असून देशात ४०० पेक्षा जास्त जागा येतील असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

भाजपाचे जे पी नड्डा म्हणाले होते आता संघाची आम्हाला गरज पडली नाही यावर भाष्य करताना दानवे म्हणाले की विरोधी पक्ष आम्हाला काय प्रश्न विचारतो त्यावर असलेलं हे त्यांचे उत्तर आहे. उगीच गैरसमज करून घेऊ नये. संघाची गरज नाही म्हणजे ती आमची मात्र संस्था आहे. आमची श्रद्धा आहे. संघ हा भाजपच्या कार्यावर कधीच हस्तक्षेप करत नाही. पूर्वीही केला नव्हता आणि आत्ताही करत नाही असे स्पष्टीकरण देत ते पुढे म्हणाले संघ हे त्यांचे स्वतंत्र कारभार करतात परंतु प्रत्येक निवडणुकीत आम्हाला हा प्रश्न विचारला जातो तुम्ही संघाच्या सल्ल्याने काम करता संघ आमचं श्रद्धास्थान आहे. मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आहे. भाजप आपल्या विचारधारेने काम करते असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले होते उद्या संघालाही डुप्लिकेट म्हणतील यावर दानवे म्हणाले भाजपात विस्तुष्ट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. 

जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बोलताना दानवे म्हणाले जरांगेनी लोकसभेला हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी सांगितले होते. त्यांनी आरक्षणासाठी आंदोलन केले होते. जरांगे हे विधानसभेला उभारणार असल्याचे बोलले होते. जरांगे आणि आमचं कोणतंही भांडण नाही, वाद नाही असे स्पष्टीकरण देत पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या लाठीमाराचा त्यांना रोष आहे. त्यांचा लढा हा आरक्षणाच्या बाजूचा लढा आहे. सरकार त्यांच्याशी संपर्कात आहे. चर्चा सुरू आहे. चर्चा बंद नाही, संवादातूनच मार्ग निघणार आहे. त्यांच्या पाठीमागे समाज आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत.