एकाच झाडाला प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

गळफास घेतलेला तरुण युवक मोहोळ तालुक्यातील

एकाच झाडाला प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

धक्कादायक घटना ....एकाच झाडाला प्रेमी युगुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

सोलापूर शहरा नाजिक असलेल्या कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने एका झाडाला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब समोर आली. सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन मृतदेह खाली उतरवून शासकीय रुग्णालय दाखल केले आहे. दोघांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मुलीच्या नातेवाईकांनी माहिती देताना सांगितले मुलगी ही सोलापूर शहरा नजीकच्या गावातील अल्पवयीन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मुलगा सुरज कुंडलीक चव्हाण वय 25 वर्षे राहणार खुनेश्वर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हा खुनेश्वर येथील रहिवाशी आहे. वर्षभरापूर्वी अल्पवयीन तरुणी ही मामाच्या गावात सुट्ट्या आली होती. खुनेश्वर गावात राहत असलेल्या सुरज चव्हाण सोबत तिचे सूत जुळलं. अल्लड प्रेमात दोघे काहीही आणि कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर दोघांनी टोकाचा निर्णय घेत एकाच झाडाला एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला 25 फेब्रुवारी रोजी सकाळी घटना उघडकीस आली आहे.