शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

उद्धव ठाकरे गटाला मोठे आव्हान.

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले

शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल

ठाकरे व शिंदे या दोन्ही गटाला शिवसेना नाव व धनुष्य बालाजी चिन्ह वापरता येणार नाही.

 निवडणूक आयोग

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे व शिंदे गटामध्ये संघर्ष वाढत चालला आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात असल्याने हा संघर्ष थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाने दावा केला पण आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे एवढंच नाही तर आगामी अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यास देखील दोन्ही गटाला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे दोन्ही गटाला मोठा दणका आयोगाने दिला आहे.

शिवसेना नाव व चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण हे निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिंदे व ठाकरे दोन्ही गटाला शिवसेना नाव व चिन्ह वापरता येणार नसल्याने दोन्ही गटांना नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपार एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.

उद्धव ठाकरे गटाला मोठे आव्हान.

शिवसेनेची ओळख आता इतिहास जमा होते की काय असा प्रश्न लोकांपुढे उभा राहिला आहे. कारण धनुष्यबान ही शिवसेना हे नाव हे दोन्ही निवडणूक आयोगाने गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांना उमेदवार निवडून आणणे हे मोठे आव्हान असणार आहे.

दोन्ही घटक पुढे नवीन आव्हान उभे शिवसेना आणि धनुष्यबाण हे दोन्ही घटना वापरता येणार नसलेले आता दोन्ही गटा पुढे नवीन आव्हान उभे राहिले आहे. दोन्ही गट काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हा निर्णय सध्या तरी अंधेरी पोट निवडणुकीसाठी लागू असणार आहे.

आता पुन्हा उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात जाणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.