कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ

कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारं

४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभाला उपस्थित राहण्याचे अभिजित पाटील यांच्यासह संचालक मंडळाचे आवाहन

पंढरपूर दी.25 श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर – गुरसाळे ,ता .पंढरपूर , जि .सोलापूर या कारखान्याचा सन २०२२-२३ च्या ४१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सोमवार दि.२६.०९. २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता या मुहूर्तावर ह.भ.प.श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहुकर श्री संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज व माजी अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज संस्थान , श्रीक्षेत्र देहु यांचे हस्ते व होमहवन पुजा संस्थापक सचिव बब्रुवाहन पांडुरंग रोंगे सर स्वेरी कॉलेज पंढरपूर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ . प्रेमलता बब्रुवाहन रोंंगे व्हाईस चेअरमन श्री विठ्ठल सह.सा.का.लि. वेणुनगर या उभयतांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आला आहे . तरी या प्रसंगी सभासद, शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावे ,अशी विनंती प्र.कार्यकारी संचालक डी.आर.गायकवाड श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील,सर्व संचालक मंडळ , सभासद ,कर्मचारी व हितचिंतक यांच्या वतीने करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चेअरमन अभिजित धनंजय पाटील यांच्या पॅनेलच्या ताब्यात आल्यानंतर सभासद शेतकऱ्यांच्या नजरा मागील उस बील थकीत आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी लागलेल्या होत्या.

निवडणुकीत शब्द दिल्याप्रमाणे अभिजित धनंजय पाटील यांनी उस उत्पादक शेतकरी आणि कामगार यांच्या थकीत रक्कमेपैकी काही रक्कम अदा करून सर्वांच्या कारखान्याविषयीच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.