विठ्ठलच्या बाबतीत भगीरथ भालके यांच्यात ताकद नाही उरलीआधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले *

शिवसेनेचे 2 हजार सभासद देणार अभिजीत पाटील यांना मतदान*

विठ्ठलच्या बाबतीत भगीरथ भालके यांच्यात ताकद नाही उरलीआधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले  *

विठ्ठलच्या बाबतीत भगीरथ भालके यांच्यात ताकद नाही उरलीआधार असलेलं राज्यातलं सरकारही गेले

शिवसेनेचे 2 हजार सभासद देणार अभिजीत पाटील यांना मतदान*

 शिवसेनेचे साईनाथभाऊ अभंगराव  यांचेही दान पडले अभिजीत पाटील यांच्याच झोळीत

विठ्ठलच्या निवडणुकीत यापूर्वीच अभिजीत पाटील यांना  शेतकऱ्यांसाठी आंदोलने करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार शेतकरी, रयत क्रांती, जनहित शेतकरी आशा अनेक संघटनांनी पाठींबा देत ,या निवडणुकीत बळ दिले होते. अशातच अखेरच्या टप्यात शिवसेनेचे जेष्ठ नेते साईनाथभाऊ अभंगराव यांनीही आपली2 हजार पेक्षा जास्त मते अभिजीत पाटील यांच्या झोळीत टाकण्याचा निर्णयामुळे  आणखी बळ वाढले आहे.

       सध्या विठ्ठलच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. यामध्ये विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांच्या कारभारावर सर्वच नेत्यांनी प्रचारात टीका सुरू ठेवल्या आहेत. अशातच महाविकास आघाडीतील साईनाथभाऊ अभंगराव यांनीही थेट भगीरथ भालके यांच्या गहाळ कारभारावर सडेतोड टीका सुरू केली आहे.
 विठ्ठलची अवस्थाअतिशय वाईट करून ठेवली आहे. आशा परिस्थितीत सावरण्यासाठी मार्ग असलेल्या भगीरथ भालके यांना राज्यातलं सरकार ही गेले आहे. त्यांनी थेट भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यामुळे सध्या पुढील काळातही या कारखान्यासाठी सहकार्य करण्याचे दोर तुटले आहेत. त्यामुळे भगीरथ भालके यांच्याकडे आता मार्गच उरले नसल्याने सभासद या निवडणुकीत नक्की विचार करणार असल्याने आमची2हजार पेक्षा जास्त असलेली मते अभिजीत पाटील यांना देणार असल्याचे अभंगराव यांनी जाहीर केले आहे. ही भालकेसाठी  फार धक्का देणारी घटना आहे.
  अभिजीत पाटील हे कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. ते साखर उद्योगातील उद्योजक आहेत. त्यामुळे हा विठ्ठल कारखाना सुरू करून भले मोठे करून ठेवलेले कर्ज फक्त अभिजीत  पाटील फेडू शकतात याची पूर्ण शास्वती असल्याने शिवसेनेने हा पाठिंबा देण्याचा योग्य मार्ग अवलंबिला असल्याचेही साईनाथ अभंगराव यांनी सांगितले.
  स्व. भारत भालके यांच्याकडे राजकारणात सर्व लोकांना सामावून घेत राजकारण खेळण्याची पद्धत होती, तो कसलाही गुण भगीरथ भालके यांच्याकडे नसल्याने त्यांना विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. यापुढील राजकारणात त्यांना  स्वभावात बदल न केल्यास बाजूला जावे लागणार असल्याचेही साईनाथ अभंगराव यांनी सांगितले आहे.