बनावट परराज्यातील दारुसह 3 वाहने जप्त, पंढरपूर विभागाची कारवाई...
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ . विजय सूर्यवंशी
बनावट परराज्यातील दारुसह 3 वाहने जप्त, पंढरपूर विभागाची कारवाई...
पंढरपूर(प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्य़ातील पंढरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने मंगळवारी पंढरपूर व माढा तालुक्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात 2 मोटरसायकल व एका कारमधून बनावट व परराज्यातील दारू जप्त करून 2 आरोपींना अटक केली . सविस्तर वृत्त असे की ,राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू व परराज्यातील दारूविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जि . सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावाच्या हद्दीत जानुबाई मंदिराच्या पाठीमागे लिंबाच्या झाडाखाली रोडवर ता.पंढरपूर येथे सापळा रचून अभिजीत श्रीमंत बनसोडे वय 26 वर्षे याला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून अटक करण्यात आली होती . त्याचेकडून एका एमएच - 13- एआर -1693 या पल्सर दुचाकीसह रॉयल स्टॅग या विदेशी बनावट मद्याच्या एकूण 180 मिलीच्या 72 बाटल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या . एकूण मुद्येमाल किंमत रू .1,07,980 / - इतका होता . सदर आरोपीत इसमास मा . प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांचेसमोर हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली होती . त्याने दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारे गुन्हयात अधिक तपास केला असता , त्यास सदर बनावट मद्य पुरवठा करणाऱ्या इसमाचे नाव निष्पन्न झाल्याने उंबरे पागे गावाच्या हद्दीत उंबरे ते बेंबळे रोडवर सापळा रचून सदानंद दत्तात्रय यादव ( माळी ) वय 32 वर्षे याला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्की या विदेशी दारूची वाहतूक करीत असताना पकडून त्याचेकडून एका एमएच - 45 - एम- 0462 या दुचाकीसह एकूण 750 मिलीच्या 60 बाटल्या जप्त करण्यात आल्या . त्याच्या घोटी , ता . माढा येथील राहते घर व घरासमोर उभ्या असलेल्या वाहनाची झडती घेतली असता , घरासमोर उभ्या असलेल्या एमएच - 14- डीएन- 8103 या स्विफ्ट वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक व्हिस्की या विदेशी मद्याच्या 750 मिलीच्या 12 बाटल्या मिळून आल्या . सदर गुन्हयात एकूण दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आलेले आहे गुन्हयातील एकूण मुद्येमालाची किंमत रू . 7,91,200 / - इतकी आहे . तर गुन्हयात मिळून आलेल्या मद्याची किंमत ही रू .56160 / इतकी आहे दोन्ही इसमांविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 ( अ ) , ( ई ) , 80 , 81 , 83 , 90 व 103 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . . ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ . विजय सूर्यवंशी , संचालक ( अंमलबजावणी व दक्षता ) प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर , अधीक्षक नितीन धार्मिक व उप अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार , दुय्यम निरीक्षक पंढरपूर श्रध्दा गडदे , दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील , सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे , जवान विजयकुमार शेळके , प्रकाश सावंत , विकास वडमिले व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी केली ...आवाहन :--जनतेला आवाहन करण्यात येते की , अवैध मद्य निर्मिती , विक्री , वाहतूक साठवणूक तसेच गोवा राज्य निर्मित मद्य , बनावट मद्याची विक्री वाहतूक अथवा साठयाबाबत माहिती असल्यास त्याबाबतची तक्रार या विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800 233 9999 व व्हॉटसअॅप क्रमांक 8422001133 यावर करण्यात यावी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल