पंढरीत आज होणार सायकल रिंगण सोहळा

पंढरपूर सायकलर्स क्लबचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून

पंढरीत आज होणार सायकल रिंगण सोहळा

पंढरीत आज होणार सायकल रिंगण सोहळा

राज्यातील ३९ गावामधून आले सायकल वारकरी

पंढरपूर- आषाढी वारी निमित्त लाखो भाविक तीर्थक्षेत्र पंढरीच्या वाटेवर असतात. मात्र मागील दोन वर्षा पासून येथील पंढरपूर सायकलर्स क्लबच्या वतीने सायकल वारीची संकल्पना सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत यंदा राज्यातील ३९ गावातील दीड हजार सायकल वारकरी शनिवारी येथे दाखल झाले असून रविवार ११ जून रोजी सायकल रिंगणचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली.

पंढरपूर सायकलर्स क्लबचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या संकल्पनेतून पायी-वारी या धर्तीवर सायकल वारी हा उपक्रम राबवीत जात आहे. सदर उपक्रमाचा उद्देश हा तरुण पिढीस सायकल चालवणेस प्रवृत्त करणे हा आहे. मागील काही वर्षापासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर सायकलर्स क्लब व असंख्य वेगवेगळ्या गावांचे सायकल क्लब यांचे मदतीने सर्वांनी एकाच वेळेस पंढरपूर मध्ये दाखल होऊन एकत्र पंढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा करण्याचा संकल्प केला आहे. यंदा बारामती सायकल क्लब यांनी २०२३ चे महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलनाची जबाबदारी स्विकारलेली आहे. सदर सायकल वारकरी शनिवार १० जून  रोजी पंढरपूर येथे दाखल झाले आहेत.

रविवार ११ रोजी पहाटे ६.३० ते ७.३० पंढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा तसेच ७.३० ते ८.३० रेल्वे मैदान येथे विठ्ठल नाम गजर करीत रिंगण सोहळा संपन्न होणार आहे. तसेच सकाळी ९.३० ते १२ या दरम्यान अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन पद्मनाभ मंगल कार्यालय येथे होणार आहे.

या सायकलवारीमध्ये पंढरपूरसह बालाघाट, बुलढाणा, दवडाई, गंगाखेड, इचलकरंजी, कोल्हापूर, कुर्डूवाडी, कोरेगाव कुपवाड, लातूर, मालेगाव, माढा नाशिक, परभणी, फलटण, पलूस, सोलापूर, संभाजीनगर, सांगली, श्रीपूर, उंब्रज, मोरगाव, बारामती आदी ठिकाणांहून सायकल वारकरी दाखल झाले आहेत.

यावेळी पंढरपूर सायकलर्स क्बलचे सूरज अष्टेकर, दीपक शेटे, श्रीकांत बडवे, मुकेश भोसले आदी उपस्थित होते.