दि. १०जून २०२३रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

यावर्षी २०२३ मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब

 दि. १०जून २०२३रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

 दि. १०जून २०२३रोजी महाराष्ट्राची पंढरपूर सायकल वारीचे आयोजन

महाराष्ट्राची दक्षिण काशी समजली जाणाऱ्या पंढरपूर येथे प्रति वर्षी आषाढी वारी निमित्ताने लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला येत असतात. मागील वर्षापासून पंढरपूर सायकलर्स क्लब पंढरपूरचे अध्यक्ष मा. श्री. उमेशजी परिचारक(मालक) यांच्या संकल्पनेतून पायी-वारी या धर्तीवर सायकल वारी हा उपक्रम राबवीत आहोत. सदर उपक्रमाचा उद्देश हा तरुण पिढीस सायकल चालवणेस प्रवृत्त करणे हा आहे. मागील काही वर्षापासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन बारामती सायकल क्लब यांनी पंढरपूर सायकलर्स क्लब व असंख्य वेगवेगळ्या गावांचे सायकल क्लब यांचे मदतीने सर्वांनी एकाच वेळेस पंढरपूर मध्ये दाखल होऊन एकत्र पंढरपूर नगर सायकल प्रदक्षिणा व मोकळ्या पटांगणामध्ये ''विठ्ठल नामघोष'' करीत सायकल रिंगण प्रथा करण्याचे उद्देशाने मागील वर्षी म्हणजेच २०२२मध्ये महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन आयोजित केलेले होते. याकरिता महाराष्ट्राभरातून ३६ठिकाणचे सायकल प्रेमींनी पंढरपूरमध्ये एकत्रित १३०० लोकांचा मुक्काम व स्थानिक २०० असे सुमारे १५०० सायकल प्रेमींनी हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. या कामी पंढरपूर सायकलर्स क्लबचे विशेष सहकारी लाभले होते.

यावर्षी २०२३ मध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन तसेच पंढरपूर सायकलर्स क्लब व अन्य यांचे सुचनेनुसार दरवर्षी एका सायकल क्लबला यजमान पद व संमेलन कार्य करणीचे अध्यक्ष क्लब म्हणून निवड केलेले आहे. 

बारामती सायकल क्लब यांनी २०२३चे महाराष्ट्र पंढरपूर सायकल वारी संमेलन यांची जबाबदारी स्विकारलेली असुन त्यांनी अखिल महाराष्ट्रातील सायकल क्लब यांना सदर सायकलवारी व संमेलनास उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले वरून महाराष्ट्रभरातून अद्याप पर्यंत ३९ सायकल क्लब यांनी प्रतिसाद दिलेला असून ते सर्व सायकल प्रेमीनसाठी दि.१० जून २०२३ रोजी सह्याद्री सायं.७.०० वाजेपर्यंत पंढरपूर येथे मुक्कामी येत असून त्यांची श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्ती निवास (नवीन) व वेदांत भवन या ठिकाणी निवास व जेवणाची सोय केलेली आहे. तसेच भक्तीरस भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला असून त्या कामी पुणे येथून विशेष गायक व साधन सामग्री मागविण्यात आलेले आहे.

दि.११ जुन २०२३रोजी पहाटे ६.३० ते ७.३० पंढरपूर नगर सायकल प्रदूषणा तसेच ७.३० ते ८.३० रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे "विठ्ठल नाम गजर" केला जाणार असून व नंतर सकाळी ९.३० ते १२.०० या दरम्यान अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकलवारी संमेलन २०२३ हे पदमनाथ मंगल कार्यालय पंढरपूर येथे आयोजित केलेले आहे.

या सायकलवारी नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण व संमेलन यांचे यावर्षीचे उद्दिष्ट पर्यावरण संतुलन वृक्षारोपण शारीरिक समृद्धी तसेच प्रत्येक शहरास सायकलिंग चे शहर म्हणून ओळख व्हावे या उद्देशाने तमाम महाराष्ट्रभरातून अंदाजे २००० सायकल प्रेमी पंढरपूर नगरीमध्ये येत आहेत. तसेच या सर्व सायकल प्रेमींना अल्पोपहार व भोजन व्यवस्था हे बारामती सायकल क्लबचे यांच्या मार्फत केलेले आहे.

या व्यवस्थेत आम्ही *मा. श्री उमेश परिचारक (मालक)* पंढरपूर तसेच पंढरपूर सायकल्स क्लब आणि बारामती सायकल क्लब यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांना नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

या सायकलवारीमध्ये पंढरपूर भुईंज बालाघाट,बुलढाणा, दवडाई, गंगाखेड ,इचलकरंजी, कोल्हापूर, कुर्डवाडी, कोरेगाव कुपवाड,लातूर,मालेगाव ,माढा नाशिक, परभणी,फलटण, पलूस, सोलापूर, संभाजीनगर, सांगली श्रीपुर, उंब्रज,मोरगाव, बारामती व इतर असंख्य शहरांन मधून सायकल प्रेमी हजर राहणार आहेत ते त्यांच्या शहरापासून पंढरपूर पर्यंत सायकलवारी करीत येणार आहेत, या मध्ये साधारण पणे ५० की. मी. ते ५०० की. मी. अंतरावरून सायकल वारी करीत येणार आहेत या कामी स्थानिक लोकांनी त्यांना सहकार्य करावे व सहभागी व्हावे हि यजमान बारामती सायकल क्लब बारामती यांच्यातर्फे विनंती.