मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मोहन शिंदे यांची शिक्षक मान्यता रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्दे

मंगळवेढा-:त्रिमूर्ती विद्या विकास मंडळ मंगळवेढा संचलित संगम विद्यालय डोंगरगाव तालुका मंगळवेढा या प्रशालेतील संस्थेची नेमणूक नसलेले शिक्षक मोहन तुकाराम शिंदे यांची नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता रद्द करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे 1 यांना दिले आहेत.

      याबाबतचे सविस्तर वृत्त असे की; संस्थेने सन 1995 -1996 या एकाच वर्षाकरीता मोहन शिंदे यांची अर्धवेळ शिक्षक म्हणून नेमणूक केली होती .परंतु तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी 5 जानेवारी 1996 च्या पत्रान्वये नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता दिली. शिंदे यांना दिलेली मान्यता चुकीची असल्याचे माहीत असूनही या प्रशालेतील मागासवर्गीय सहशिक्षक डी. के. साखरे याना नोकरीतुन काढून टाकण्यासाठी संस्थाअध्यक्ष नाना उन्हाळे व मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे यांनी जाणीवपूर्वक व खोडसाळपणे सदरची मान्यता पुरस्कृत ( sponsored ) केली. सदर प्रकरणी साखरे यांनी शिक्षण उपसंचालक पुणे यांच्या कडे दाद मागितली परंतु सदर प्रकरणामध्ये सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी स्वतः अडकले असल्याने शिक्षण उपसंचालक यांनी साखरे यांना दाद दिली नाही.त्यावरती नाराज होऊन डी. के. साखरे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटीशन नं.55/2022 दाखल केले होते. त्यावरती सुनावणी घेऊन शिंदे यांची नियमबाह्य व चुकीची शिक्षक मान्यता 24 ऑक्टोबर 2022 पूर्वी रद्द करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण उपसंचालक पुणे यांना दिले आहेत.

          उच्च न्यायालयाच्या या निर्णनयामुळे भ्रष्ट संस्था चालकांचे व मुख्याध्यापकांचे धाबे दणाणले असून शिक्षक वर्गामध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.