पंढरपूर येथील 10 बेडच्या हॉस्पिटल ला रक्तपुरवठा केंद्राची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

महाराष्ट्रातील 35बेकायदेशीर रक्तपुरवठा केंद्रास परवानगी  देण्याचा आरोग्य विभागाचा घाट.

पंढरपूर येथील 10 बेडच्या हॉस्पिटल ला रक्तपुरवठा केंद्राची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा

पंढरपूर येथील 10 बेडच्या हॉस्पिटल ला रक्तपुरवठा केंद्राची परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. जनतेची मागणी

आरोग्य मंत्री तानाजी सावंत महाराष्ट्रासह पंढरपूरच्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचे काम. 

आरोग्य मंत्री तानाजी सावंत अनभीज्ञ,तर नहीत ना.?

महाराष्ट्रातील 35बेकायदेशीर रक्तपुरवठा केंद्रास परवानगी  देण्याचा आरोग्य विभागाचा घाट.

पंढरपूर दिनांक 4.. ऑक्टोंबर राज्य रक्त संक्रमण परिषदेने पंढरपूर येथील डॉ गजानन बागल यांच्या हॉस्पिटल ला आतापर्यंत दोन वेळा बागल यांचा अर्ज नामंजूर केला आहे. डॉ. बागल यांना व्यक्तीशी प्रत्यक्ष रक्त संकलन यामधील कोणताही अनुभव नाही. बागल यांच्या हॉस्पिटलमध्ये सागर जाधव हा नामक दहावी नापास असून हाच व्यक्ती अनेक वर्षापासून पंढरपुरातील रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळत आहे.डॉ बागल यांनी त्यांच्या नावे खोटा प्रस्ताव तयार करून रक्तपुरवठा केंद्र बोगस परवानगी घेतली असल्याचे जनतेच्या निदर्शनास गेल्या वर्षीपासून आम्ही आमच्या साप्ताहीक साई सम्राट प्रसार माध्यमातून जनतेसमोर आणल्यानंतर अनेकांनी आमचे अभिनंदन केले. डॉ. बागल यांच्या रकपेढीचे प्रकरण मंत्रालयापर्यंत पोचले त्या अगोदर रक्त संकलन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी रक्तपेढी 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले. म्हणजे अधिकाऱ्यांनी रडक्याचे डोळे पुसणे अशी कारवाई करून अर्थपूर्ण व्यवहार केल्याने पुन्हा जैसे थे रक्तपुरवठा केंद्र सुरू आहे. डॉ. बागल यांनी रक्तपुरवठा केंद्र परवानगी घेताना रक्तपेढीसाठी रक्त संकलन तज्ञ म्हणून वेगळीच नावे दिसून आले आहेत परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी रक्त संकलनाचा तज्ञ कोणीही परवानगीच्या कागदावरील हे लोक पुणे या ठिकाणी काम करत आहेत. 

प्रत्यक्षात डॉ. बागल यांनी रक्त संकलन या बाबतीत प्रशिक्षण घेणे गरजेचे होते परंतु त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारले असता मला यातील काहीही माहिती नाही माझ्याकडे सागर जाधव आहे तो हे रक्तपेढी चालवत आहे त्यांनाच सर्व माहिती विचारा मी फक्त माझे हॉस्पिटलचे जागा भाड्याने दिले आहे असे डॉ. बागल यांनी सांगून हात वर केले आहेत परंतु परवानगी त्यांच्या नावे असल्याने शासन अथवा न्यायालयीन कारवाईस डॉ. बागल हे जबाबदार असणार आहेत. त्यामुळे थोड्या दिवसातच याप्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहोत हे तितकं सत्य आहे. कारण पंढरपूर येथील डॉ. बागल यांच्याकडील रक्तपुरवठा करणारा सागर जाधव यांनी इतर रक्तपुरवठा केंद्राच्या नावे असणाऱ्या बोगस पावत्या तसेच अनेक रुग्ण दगावल्याच्या घटना त्याचबरोबर डॉ. बागल यांच्याकडून रक्तपुरवठा झाला आणि अनेक हॉस्पिटलच्या रुग्णाला त्याचा त्रास ही झाला असल्याच्या तक्रारी डॉक्टरांनी अनेक वेळा केल्या आहेत. मुळात पंढरपूर येथे दोन रक्तपुरवठा केंद्र असताना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयास रक्तपुरवठा केंद्राची परवानगी दिली आहे असे असतानाही डॉ.बागल यांच्या दहा बीडच्या हॉस्पिटलला बेकायदेशीर परवानगी देण्याचा घाट आरोग्य अधिकाऱ्याने घातला असल्याचे निदर्शनात येत आहे या प्रकरणी महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री यांनी तात्काळ लक्ष घालून त्वरित रक्तपेढीची परवानगी रद्द करावी अशी नागरिकातून मागणी होत आहे.

पंढरपूर येथे सद्यस्थितीत दोन रक्त केंद्र कार्यान्वित असून जिल्हा उप रुग्णालय येथे एक रक्तपुरवठा केंद्र व एक खाजगी रक्तपुरवठा केंद्र आहे. सद्यस्थितीत पंढरपूरचा विचार करता आहे या रक्त केंद्रांची संख्या माफक असून नवीन रक्त केंद्राची अजिबात गरज नाही. पंढरपूर येथील डॉक्टर गजानन बागल यांच्या श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल द्वारे राज्य रक्त संक्रमण परिषद येते आत्तापर्यंत दोन वेळा अर्ज रक्त केंद्रासाठी केला गेला होता परंतु पंढरपूरला गरज नसल्यामुळे तसेच स्वामी समर्थ हॉस्पिटल हे फक्त दहा बेडचे क्षमतेचे असल्याने परवानगी नाकारण्यात आली. तथापि आर्थिक ताकतीच्या जोरावर व राजकीय वरदहस्त घेऊन पुनर्विचार अर्ज केला आहे खात्रीलायक सूत्रानुसार राज्य रक्त संक्रमण परिषद राज्य कर्त्यांच्या दबावाखाली अर्ज मंजूर करत असून पंढरपूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सध्याचे आरोग्य मंत्री करत आहेत. मागील दोन वर्षात राज्य रक्त संक्रमण परिषदेने 100 बेडच्या विठ्ठल हॉस्पिटल येथे रक्त केंद्र सुरू करण्यास परवानगी नाकारली होती त्यामध्ये असे नमूद होते .पंढरपूर येथे सध्या गरज नाही तसेच रुग्णालय संलग्न रक्त केंद्रासाठी 200 बेडची क्षमता असणे गरजेचे आहे.तरी आपणास पंढरपूरवासिया तर्फे तसेच पंढरपुरातील चालू दोन रक्त केंद्रांमार्फत विनंती करतो की आपण या चुकीच्या कामाला लगाम लावावा. तसेच आहे या संस्था जिवंत राहतील याची काळजी घ्यावी.

मा. रोहित दादा पवार यांनी पत्र लिहून सुद्धा सध्याच्या आरोग्य मंत्री कोणालाही नजुमानता चुकीच्या पद्धतीने कारभार करत आहेत तरी त्यास प्रतिबंध व्हावा ही विनंती केली आहे. या प्रकरणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे अनभिज्ञ आहेस की नाही हे त्यांना माहिती परंतु आरोग्य मंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी तत्काळ याची माहिती घेऊन 35 रक्त पुरवठा केंद्रास बेकायदेशीर परवानगी देत असतील तर ते तत्काळ रद्द करून संबंधित अधिकाऱ्यावर कडक व योग्य ती कारवाई करावी. सध्याच्या बेकायदेशीर रक्त पुरवठा केंद्राची परवानगी रद्द न केल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा मुद्दा देशात व महाराष्ट्रात सर्वाधिक गाजणार आहे हे मात्र नक्की आहे.