पंढरपूरचे नेत्रतज्ञ डॉ. मनोज भायगुडे खरच माणसातील देवमाणूस. लक्ष्मण भाऊ शिरसट.
20हजाराचा स्कोर पूर्ण करेनेचा माझा मानस. डॉ मनोज भायगुडे

पंढरपूरचे नेत्रतज्ञ डॉ. मनोज भायगुडे खरच माणसातील देवमाणूस. लक्ष्मण भाऊ शिरसट.
पंढरपूरचे नेत्रतज्ञ डॉक्टर मनोज भायगुडे यांचा आज मंगळवार दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी 42 वा वाढदिवसा निमित्त उपजिल्हा रुग्णालय समोरील जय बजरंग हॉटेलचे युवा उद्योजक लखन माने , भारत भाऊ माने,पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसठ यांनी डॉ.मनोज भायगुडे यांना फेटा बांधून तुळशी हार व शाल देऊन शुभेच्छा देताना लक्ष्मण भाऊ शिरसठ यांनी मनोगत व्यक्त करताना डॉ. हे आपल्यासाठी आणि डोळ्याच्या रुग्णांसाठी देवमाणूस असल्याचे सांगितले.
युवा उद्योजक लखन माने यांनी डॉ मनोज भायगुडे यांच्या 42व्या वाढदिवसा निमित्त जय बजरंग हॉटेल मध्ये केक कापून तसेच तुळशीचा मोठा हार,शाल देऊन डॉ मनोज भायगुडे यांना शुभेच्या दिल्या.यावेळी कांबळे सरानी शुभेच्या देताना सांगितले की आपणास जर दृष्टी असेल तर आपण जग पाहू अन्यथा अंधारमय राहू त्याच बरोबर डॉ मनोज भायगुडे यांनी अनेक डोळ्याच्या रूग्णांना शस्त्रक्रिया करताना मदत केली आहे. डॉ हे नेत्रतज्ञ असल्याने त्यांचा अनेक ठिकाणी मान सन्मान, व पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.या वाढ दिवस निमित डॉ मनोज भायगुडे यांना फेटा बांधून तुळशी हार व शाल देऊन शुभेच्छा दिल्या.
डॉ मनोज भायगुडे यांनी सन्मानाला उतर देताना सांगितले की 20हजाराचा स्कोर पूर्ण करेनेचा माझा मानस आहे तो करणार आहे आज माझा वाढ दिवसा निमित्त माझा सन्मान केला त्या बद्दल मी सर्वाचे आभार मानतो असे म्हणाले.