उजनी धरणातूनआठ मार्च रोजी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले

बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या वर गुन्हा दाखल होणार

उजनी धरणातूनआठ मार्च रोजी भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडले

पंढरपूर  दि.7मार्च संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर व उपलब्ध पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करण्याच्या दृष्टीने उजनी धरणासह इतर प्रकल्पातील पाणी साठे पिण्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

आठ मार्च रोजी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी भीमा नदीकाठचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे बेकायदा पाणी उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संबंधित साहित्य जप्त करण्यात येणार आहे.