भारतीय संविधान हे मानवी कल्याणाचा सुंदर दस्तऐवज -डी. के. साखरे.

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

भारतीय संविधान हे मानवी कल्याणाचा सुंदर दस्तऐवज -डी. के. साखरे.

  भारतीय संविधान हे मानवी कल्याणाचा सुंदर दस्तऐवज -डी. के. साखरे.

मंगळवेढा -भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ठ संविधान असून मानवी कल्याणाचा सुंदर दस्तऐवज असल्याचे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे राज्याध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले. ते रविवार दिनांक 26.11.2023 रोजी मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या संविधान दिन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.यावेळी मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. पुढे बोलताना साखरे म्हणाले की ; जगातील सर्व संविधानांचा अभ्यास करून दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेले हे संविधान स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या तत्वावर आधारित आहे. तर यावेळी बोलताना रणजित माने म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधानामुळे देशाची अखंडता कायम असून संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यातच आपल्या देशाचे हित सामावले आहे.तसेच यावेळी उत्तम अवघडे गुरुजी व दिगंबर कुचेकर गुरुजी यांनी भीमगीते गायली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रदीप परकाळे यांनी केले तर एन. डी. एम. जे. चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख येताळा खरबडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय गेजगे, बापू अवघडे, माजी नगरसेविका सुनीता अवघडे,गोपाळ आयवळे, शिरीष कांबळे, वसंत मोची, अंकुश खवतोडे, समाधान भोसले, शब्बीर सय्यद, वैशाली चंदनशिवे, वंदना खरबडे, माधुरी चंदनशिवे, संध्या साखरे, औदुंबर लंगडे, ज्ञानेश्वर (माऊली )कोंडूभैरी,पत्रकार सुनील कसबे,पाराप्पा ढावरे,सुभाष पवार, आदि सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.