भटुंबरे ग्रामपंचायत वारकरी भाविकांच्या सोयी सुविधासाठी सज्ज.

जिल्हा परिषद मुख्याधिकारी श्री दिलीप स्वामी यांच्या सूचनांचे पालन

भटुंबरे ग्रामपंचायत वारकरी भाविकांच्या सोयी सुविधासाठी सज्ज.

भटुंबरे ग्रामपंचायत वारकरी भाविकांच्या सोयी सुविधासाठी सज्ज

पंढरपूर दि.7 जुलै शेजरी लगत असणारे भटुंबरे ग्रामपंचायतीने नेहमी प्रमाणे आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांसाठी प्लॅस्टिक कचरा साठवण्यासाठी पाच ठिकाणी संकलन केंद्र उभे केले आहेत. त्याचबरोबर हरित वारी अंतर्गत वारकऱ्यांचे हस्ते 150 रोपांची लागवड करण्यात आली असून रस्त्याच्या कडेचे काटेरी झाडे झुडपे साफसफाई स्वच्छता करण्यात आली . याबाबतीत जिल्हा परिषद मुख्याधिकारी दिलीप स्वामी . उपमुख्य कार्यकारी . श्री इशादीन शेळकंदे. पंढरपूर पंचायत समिती गट विकास अधिकारी श्री प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखली व त्याने दिलेल्या सूचनाचे पालन करण्यात आले आहे.

गावातील हाय मास्ट दिवे दुरुस्ती करून सुरू करण्यात आले आहेत त्याचबरोबर रोगराई होऊ नये रोगराई मुक्त वारी व्हावी यासाठी पूर्वतयारी करण्यात आली. यावेळी महत्त्वाचे म्हणजे हिरकणी कक्षाची स्थापना केल्याने स्तनदा मातांना स्तनपान करण्यासाठी गावातील अंगणवाडीच्या ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आले आसून यात्रा काळात कोरोना साथीचा आजार पसरू नये याकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण कक्ष भटुंबरे जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे. तसेच रोगराई होऊ नये रोगराई मुक्त वारी व्हावी यासाठी म्यालिथिआन पावडर टाकून स्वच्छता ठेवण्यात आली आहे.

भटुंबरे ग्रामपंचायत परिसरातील हॉटेल मठ फळे विक्रेते यांना नोटीसा देऊन स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी सूचना देण्यात आले आहेत नष्ट करणे याबाबत ही सर्व वारकरी भाविकांना सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर पाणीपुरवठा स्तोत्रांचे त्यांचे शुद्धीकरण करण्यात आले आहे. यासाठी सुरेखा डोके मॅडम कृषी पर्यवेक्षक 

सरपंच श्रीमती मंडाबाई भारत ढवळे. ग्रामसेवक एस पी उघडे मॅडम. अतिरिक्त ग्रामसेवक असलम मुलानी संतोष गायकवाड यांनी प्रत्यक्ष गावामध्ये थांबून वारकरी भाविकांच्या सोयीसुविधासाठी परिश्रम घेतले आहे.