बार्शी तालुक्यातील आवटी जामगाव येथील मातंग समाजातील कुटुंबीयांना नग्न करून मारहाण.

आठवड्यातील तिसरी घटना

बार्शी तालुक्यातील आवटी जामगाव येथील मातंग समाजातील कुटुंबीयांना नग्न करून मारहाण.

बार्शी तालुक्यातील आवटी जामगाव येथील मातंग समाजातील कुटुंबीयांना नग्न करून मारहाण

आठवड्यातील तिसरी घटना

पंढरपूर दिनांक 28 जुलै बार्शी तालुक्यातील आवटी जामगाव येथील मातंग समाजातील कुटुंबीयांना नग्न करून मारहाण केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली आहे.

या आठवड्यामध्ये यवतमाळ जिल्हा बार्शी तालुक्यामध्ये व अनेक ठिकाणी असे मागासवर्गीयांना गावातील सवर्ण गाव गुंडांनी मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत . बार्शी तालुक्यातील आवटी जामगाव येथील मातंग समाजातील अडसूळ नावाच्या कुटुंबावर गावातील सुवर्ण जातीच्या गाव गुंडांनी अमानुषपणे स्त्रिया पुरुष व लहान मुलांना देखील नग्न करून मारहाण केली आहे.

ही घटना म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र व सोलापूर जिल्ह्याला लाजिरवाणी वाटणारी हसून बार्शी तालुक्याच्या अंकित असणाऱ्या पोलीस ठाण्यातील पोलीस प्रशासनाने त्या गावंडावर कोणतीही कारवाई अद्याप केलेली नाही. अथवा अन्यायग्रस्त अडसूळ कुटुंबाची दखल घेतली गेली नाही. या घटनेमुळे मानव जातीला व पोलिसांच्या ब्रीद वाक्याला काळिमा फासणारी वाटत आहे. अडसूळ कुटुंबाला मारहाण करणाऱ्या गाव गुंडांना तत्काळ अटक न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मातंग एकता आंदोलनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन केली जातील असा इशारा पंढरपूर तालुक्यातील मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. गृहमंत्री रमेश बागवे पंढरपूर तालुका अध्यक्ष सुरेश तुकाराम मस्के सोलापूर जिल्ह्याचे नेते गणेश वाघमारे प्रकाश साठे सतीश मस्के बाजीराव कांबळे नवनाथ मस्के जिल्हाध्यक्ष आनंद लोंढे जनसेवा जिल्हा अध्यक्ष अशोक पाटोळे या सर्व पदाधिकारी यांनी पंढरपूर तहसीलदार श्री सुशील बेलेकर यांना या घटनेचे नियोजन दिले असून सदर गाव गुंडांवर तात्काळ अटक करून कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.