हर घर तिरंगा साठी पोस्ट ऑफिस सज्ज

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती

हर घर तिरंगा साठी पोस्ट ऑफिस सज्ज

हर घर तिरंगा साठी पोस्ट ऑफिस सज्ज

पोस्टऑफिसमध्ये राष्ट्रध्वज मिळणार 25 रुपयात

पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच सेवा

पंढरपूर: स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात याकरिता दि 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान *हर घर तिरंगा* अभियान राबविण्यात येत असून,या करिता नागरिकांना राष्ट्रध्वज पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असून,अवघ्या पंचवीस रुपयात पोस्ट ऑफिसमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत,

पंढरपूर पोस्ट ऑफिसमध्ये आज राष्ट्रध्वज विक्रीस प्रारंभ करण्यात आला,पहिला राष्ट्रध्वज श्री शशिकांत हरिदास सोलापूर जिल्हा अध्यक्ष अ. भा. ग्राहक पंचायत यांनी खरेदी करत या मोहिमेचा शुभारंभ केला. प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावणे हे कर्तव्य आहे. व ते स्वाभिमानाने ते पार पाडले पाहिजे असे आवाहन श्री हरिदास सरांनी केले. या प्रसंगी श्री सुहास निकते सोलापूर जिल्हा सचिव अ. भा. ग्राहक पंचायत हे उपस्थित होते.

मागील वर्षी ही पंढरपूर पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून याकरिता विशेष मोहीम राबवत ही मोहीम यशस्वी केली होती.यावेळी ही पोस्टमनच्या माध्यमातून जनजागृती करत ही मोहीम जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येत असून, आपण आपल्या ऑफिस मधील विशेष काउंटर मार्फत व पोस्टमन बांधवाच्या मार्फत,आपल्या भागात पत्राचे वाटप करताना घरपोहच तिरंगा उपलब्ध करून देतील असे श्री उदय बंडगर पोस्टमास्तर पंढरपूर यांनी सांगितले.

एक पाऊल राष्ट्रभक्तीसाठी तिरंगा घरोघरी पोहचविण्यासाठी” 

आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिस मधून आपण राष्ट्रध्वज खरेदी करू शकता अथवा आपल्या भागातील पोस्टमनच्या मार्फत घेऊ शकता किंवा www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर आपली मागणी नोंदवल्यास पोस्टमन घरपोच आणून देतील. तरी सर्वानी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री चंद्रकांत भोर अधिक्षक डाकघर पंढरपूर यांनी केले आहे. (चौकट मधील फोटो श्री चंद्रकांत भोर अधिक्षक डाकघर पंढरपूर)

हर घर तिरंगा* या विशेष मोहिमेकरिता पंढरपूर पोस्टऑफिसमधून प्रथम ग्राहक श्री शशिकांत हरिदास सोलापूर जिल्हा अध्यक्ष अ. भा. ग्राहक पंचायत यांना तिरंगा वितरित करत विक्रीचा शुभारंभ करताना पोस्टमास्तर श्री उदय बंडगर व पोस्टल स्टाफ .