पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न

सायकल फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न

पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा देश अंतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त माझी माती माझा माझा देश अंतर्गत दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्र राबवण्याबाबत निर्देश दिले आहेत त्यानुसार आज पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने नगरपालिका सभागृहामध्ये पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सर्व कर्मचाऱ्यांना खालील प्रमाणे शपथ दिली भारतात २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याची स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्याप्रति सन्मान बाळगू ,देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करू अशी शपथ सर्व कर्मचाऱ्यांना दिली तसेच पंढरपूर शहरातील असलेल्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये १० ऑगस्ट ते १४ ऑगस्ट पर्यंत देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंगभरण स्पर्धा इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत तसेच १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६=३० वाजता सायकल फेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे. तसेच १४ ऑगस्ट सकाळी १० वाजता नगरपरिषद संचलित लोकमान्य विद्यालय येथे चित्रकला स्पर्धा व रंगभरण स्पर्धा होतील १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० शहरातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा ह्या आपल्या आपल्या परिसरामध्ये प्रभात फेरी काढणार आहेत तसेच सकाळी ९ वाजता स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिक यांची आठवण पुढील पिढीला राहावी म्हणून शिलाफलक लोकमान्य विद्यालय येथे लावण्यात येणार आहे तसेच सकाळी ९.३० वाजता हुतात्मा स्मारक येथे ध्वजारोहण कार्यक्रम व स्वातंत्र्यसैनिक यांच्या वारसांचा सन्मान करण्यात येणार असून याचवेळी वसुधा वंदन अंतर्गत अमृत रोपवाटिका तयार करण्यासाठी राष्ट्रमाता जिजामाता उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे असे विविध उपक्रम पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली पंचप्रण शपथ कार्यक्रमास उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर कार्यालय अधीक्षक जानबा कांबळे कर अधिकारी सुप्रिया शिंदे नगर अभियंता नेताजी पवार आरोग्य अधिकारी शरद वाघमारे नागनाथ तोडकर विद्युत अभियंता राजकुमार सपाटे पाणीपुरवठा अभियंता राजकुमार काळे अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते