आराधी देवदासी महीलांना ५ हजार पेन्शन व स्वतंत्र महामंडळासाठी मागणी करणार - दिलीप धोत्रे.
आपण भाकरीही जळू नये म्हणून तिला फिरवतो
आराधी देवदासी महीलांना ५ हजार पेन्शन व स्वतंत्र महामंडळासाठी मागणी करणार - दिलीप धोत्रे.
पंढरीत मनसेकडून देवदासी तृतीयपंथी यांचा सन्मान
पंढरपूर देवीचे भक्त म्हणून ओळख असणारे आराधी, देवदासी व तृतीयपंथी यांना सरकारकडून किमान पाच हजार रुपये पेन्शन म्हणून मिळाले पाहिजे अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहोत. त्याचबरोबर देवदासी महिलांसाठी व मातांसाठी राज ठाकरेंच्या माध्यमातून स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे अशी प्रतिक्रिया मनसेने ते दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केली ते पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व देवीचे भक्त असणारे आराधी, देवदासी, तृतीयपंथी यांचा नवरात्र निमित्ताने मनसेच्या वतीने व स्टेशन रोड नवरात्र महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी दत्तासिंह रजपूत, विक्रमसिंह रजपूत, तसेच आराधी देवदासींचे प्रमुख व मनसेचे नेते दिलीप धोत्रे व सौ. माधवी धोत्रे व्यासपीठावर होते.यावेळी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की राज्यांमध्ये विविध महामंडळे आहेत. परंतु देवदासी माता महिलांसाठी कोणतेही महामंडळ नाही. त्यांचे स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यात यावे अशी मागणी आपण सरकारकडे करणार आहे. सध्या निवडणुकीचा माहोल आहे. तुम्हाला समजले पाहिजे पोटनिवडणुकीत निवडून आलेले फक्त निघून गेले. पंढरपूरसाठी कोणताही महत्त्वाचा विकास केला नाही. माता-भगिनींना न्याय नाही. बेरोजगारी तशीच आहे. कोणतेही काम पंढरपूरकरांसाठी केले नाही अशी परिस्थिती आहे हे आपल्याला माहितीच आहे.निसर्ग बदलाचा नियम असतो त्याप्रमाणे यंदा बदल घडला पाहिजे. आपण भाकरीही जळू नये म्हणून तिला फिरवतो त्याच पद्धतीने यंदा मतदानात बदल घडवा अशी अपेक्षा उपस्थित देवीच्या भक्तांकडून असल्याचे सांगितले. मी एका गरीब कुटुंबातील दगडफोड्याचा मुलगा आहे. पंढरपूर शहर व तालुक्यात अनेकांना मदत करतो माझ्याकडे आलेला माणूस कधीच रिकाम्या हाताने जात नाही. कोरोना कालावधीतही आपला माणूस उपाशी झोपता कामा नये यासाठी झटलो ते आपण पाहिलेच आहे. गरीबाची माया गरिबालाच कळते श्रीमंत फक्त कामापुरते येणार आणि निघून जाणार त्यामुळे तुमच्यापैकी कोणालाही कसल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही माझ्याकडे या असा शब्दही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्याकडून करण्यात आलेल्या येथोचीत सन्मानाने उपस्थित देवीचे भक्त भारावून गेले होते. आराधी, देवदासी तृतीयपंथी यांना मिळालेल्या साडी, ड्रेस, फराळासाठी त्यांनी आभार व्यक्त करत मनसे नेते दिलीप धोत्रे यांना आशीर्वाद दिला.ही एकाच धुन्यात गोळा होणारी ३५ ची साडी नाही,
मध्यंतरी काही कार्यक्रमांमध्ये महिलांना अनेकांनी साड्या वाटल्या परंतु त्या साड्या पहिल्याच धुन्या मध्ये गोळा झाल्या कारण त्या फक्त ३५ रुपयांच्या होत्या परंतु मी आपणास सन्मान करुन देत असलेली साडी ही चांगल्या दर्जाची असून ती पहिल्या धुन्यात गोळा होणार नाही, दिलं तर चांगलंच द्यावं त्याप्रमाणे आज मी या ठिकाणी आपला सन्मान करीत असल्याचे दिलीप धोत्रे यांनी सांगितले.