मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिले "ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याचे" ज्ञान

सुखसोयीबाबत काळजी घेणे कायद्याने बंधनकारक

मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिले "ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याचे" ज्ञान

मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना दिले "ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याचे" ज्ञान

न्यायाधीश श्री.लंबे यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन कायदेविषयक शिबीर संपन्न

        पंढरपूर- अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान कार्यक्रमाअंतर्गत व जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे यांच्या कल्पनेतुन मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथे ज्येष्ठनागरिकांना दुरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन कायदेविषयक शिबीराचे आयोजन न्यायाधीश ए. ए. सोनवलकर, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दुरदृष्यप्रणालीव्दारे घेण्यात आलेल्या शिबीराच्या प्रमुख पाहुण्या लेखिका श्रीमती म्रुदुल यांनी ज्येष्ठ नागरिकांना तणावपुर्ण जवीन कसे जगायचे याबाबत सांगितले त्यामध्ये अधिक तणावपुर्ण वातावरणामध्ये शरीरावर व वागणुकीवर परिणाम होतो त्यासाठी जास्त तणाव घेऊ नये असेही सांगितले. 

  कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश श्री. सोनवलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना कायद्याची माहिती दिली. यामध्ये कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे, पाल्य म्हणजे ज्येष्ट नागरिक यांच्या रक्त नात्यासंबंधातील मुले व मुली यामध्ये मुलगा, मुलगी, नातू-नात यांचा समावेश होतो, या कायद्यांतर्गत ज्येष्ठांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना तुरूंगवास, दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे, त्यांच्या सुखसोयीबाबत काळजी घेणे कायद्याने बंधनकारक असल्याचे सांगितले.

दर शिबीरास पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी प्रस्तावना केली तर सुत्रसंचालन अधिवक्ता संघाचे सचिव ॲड. राहुल बोडके केले व कार्यक्रमाचे आभार श्रीमती शितल आसबे यांनी मानले. सदर कार्यक्रमास अॅड.सागर गायकवाड, मातोश्री वृद्धाश्रमाचे श्री धनाजी राक्षे, सिस्टीम ऑफिसर श्री. नईम मोमीण, लिपीक श्री. व्ही. डी. ढोबळे, श्री. विवेक कणकी, श्री. ए. व्ही. अंबुरे तसेच वृद्धाश्रमामधील ज्येष्ठ वृद्ध मोठया संख्येने उपस्थित होते.