22 नोव्हेंबर पर्यंत अनुकंप धारकांना नोकरीवर घ्या अन्यथा जिल्हाधिक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा

सोलापूर जिल्हाधिकारी श्रीमती शमा पवार यांना उपोषणाचे दिले निवेदन

22 नोव्हेंबर पर्यंत अनुकंप धारकांना नोकरीवर घ्या अन्यथा जिल्हाधिक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने जिल्ह्यातील अनुकंपा नियुक्ती बाबत मा जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन*

 दिनांक 23 ऑक्टोबर दि 22 नोव्हेंबर 2022 पर्यंत अनुकंपाधारकांना नियुक्ती न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुकंपा धारक कुटुंबियांसमवेत उपोषणास बसणार असल्याचा दिला इशारा*

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील ३१ अनुकंपाधारकांना त्वरित सेवेत नियुक्ती द्यावी म्हणून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष कॉ. सिद्धाप्पा कलशेट्टी, कामगार नेते नानासाहेब वाघमारे, रामभाऊ पवार, धनराज कांबळे,हरी देवकर, बाबासाहेब पवार यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हादंडाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती शमा पवार यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की, सन २००४ पासून सोलापूर जिल्ह्यातील विविध नगरपालिकेमधील अनेक कर्मचारी मयत झाले आहेत अशा मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा योजनेखाली त्वरित सेवेत नियुक्ती द्यावी म्हणून शासनाने वेळोवेळी निर्देश दिलेले असताना सुद्धा अद्याप पर्यंत गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून अनेक अनुकंपाधारक आजही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत शासनाने जिल्हास्तरावर याबाबत प्रतीक्षा सूची ठेवण्याबाबत निर्णय दिले आहेत व नगरपालिका अथवा इतर विभागांमध्ये रिक्त जागा असल्यास त्या जागेवर यांची समावेशन करण्याबाबत ही सुचना दिलेल्या आहेत असे असताना प्रत्येक वर्षी केवळ सेवानिष्ठतेनुसार प्रतीक्षा सूची यादी तयार केली जाते परंतु प्रत्यक्षात एकही अनुकंपाधारक यांना न्याय दिला जात नाही त्यामुळे आपण स्वतः लक्ष घालून मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या या बाबी निदर्शनास आणाव्यात व आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय व शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यातील विविध नगरपालिकेमधील ३१ अनुकंपाधारकांना त्वरित नगरपालिकेमध्ये नियुक्ती देऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली तसेच २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अनुकंपा भरती न झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी व सर्व अनुकंपाधारक आपल्या कुटुंबिया समवेत जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा इशाराही यावेळी जिल्हाध्यक्ष कॉ. सिद्धाप्पा कलशेट्टी यांनी दिला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत या अनुकंपाधारकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले यावेळी नगर विकास विभागाचे सह. आयुक्त आशिष लोकरे व एन के पाटील व सर्व अनुकंपा धारक उपस्थित होते.