पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्या मान्य

अॅडव्हान्सची रक्कम १२५००/- दिवाळी पुर्वी देण्यात येणार

पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्या मान्य

पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्या मान् 

दिवाळीपूर्वी संप टळला

पंढरपूर दिनांक 16 ऑक्टोबर पंढरपूर नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या साठी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शाखेच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या कक्षामध्ये मुख्याधिकारी अरविंद माळी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी सुनील वाळूजकर, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह कार्याध्यक्ष शरद वाघमारे, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, अँड.किशोर खिलारे,अनिल गोयल, जयंत पवार तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर कॉ. संघटनेचे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या शिष्टमंडळा समवेत बैठक झाली. या बैठकीमध्ये सुरुवातीस सुनील वाळूजकर यांनी पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या थकित रकमा व सातव्या वेतनाच्या दोन हप्त्याची रक्कम दिल्याबद्दल प्रथमत: आभार व्यक्त केले तसेच आपण वेळोवेळी नगरपरिषदेच्या कर्मचा-याच्या मागण्या बाबत सकारात्मक भुमिका घेत सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले आहे. तरी दिनांक २२-१०-२०२२ पासून दिवाळी सुरू होत असल्याने दिवाळीपूर्वी आमच्या मागण्या मान्य कराव्यात या झालेल्या चर्चे मध्ये पंढरपूर नगरपरिषद कर्मचा-यांना सातव्या वेतनाचा फरकाचा तिसरा हप्त्या पोटी रु ७५०० देण्याचे ठरले 

 २) राज्य शासनाने जाहीर केलेला ३ टक्के महागाई भत्याचा ७ महिन्याचा फरक दिवाळीपुर्वी देण्यात येणार आहे

३) दिवाळी अॅडव्हान्सची रक्कम १२५००/- दिवाळी पुर्वी देण्यात येणार आहे. 

४) सन २००५ नंतर नगरपरिषदेमध्ये लागलेल्या कर्मचा-यांचे अंशदायी पेन्शन योजनेची न.पा.हिश्याची १० टक्क्याची रक्कम अद्यापपर्यंत DCPS च्या खात्यावर जमा करण्याच्या दृष्टीने सर्व माहिती घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले. 

५) सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांना रजा वेतन, उपदान, प्रा. फंडामधील रक्कम लवकरच देण्यात येतील. . 

६) पंढरपूर नगरपरिषद अनेक लिपीक,शिपाई, सफाई कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. अश्या कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणा-या रक्कमा दिल्या जात नाहीत त्यासाठी कोर्टामार्फत वारस सर्टिफिकेट मागितले जाते परंतु मिळणारी रक्कम अनेक वेळा अतिशय कमी स्वरूपाची असते कोर्टात होणारा खर्च पहाता मिळणारी रक्कम कर्मचा-यांच्या हातामध्ये येत नाही तरी संबंधीत कर्मचा-यांना सेवापुस्तकामध्ये जो नॉमीनी दिला आहे त्या व्यक्तिला इतर वारसांची संमती घेऊन किंवा ज्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांची वारसा हक्काने नियुक्ती देण्याचे आहे अशा कर्मचाऱ्यांची लेखी स्वरूपात प्रतिज्ञापत्र घेऊन सेवानिवृत्ती नंतरची रक्कम अदा करण्याचे ठरले मात्र ज्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या तक्रारी असतील अशा कर्मचाऱ्यांचा वारसांना कोर्टामार्फतच वारस सर्टिफिकेट घेऊनच रक्कम देण्याचे ठरले आहे

 ८) सध्या चतुर्थश्रेणी कर्मचारी व सफाई कर्मचा-यांना गणवेश देण्याबाबत निविदा मागवण्यात आले असून लवकरच गणवेशाचे वाटप केले जाईल

९) नगरपरिषदेमधील सर्व कर्मचा-यांना १०,२०, व ३० वर्ष सेवा पुर्ण केलेल्या कर्मचा-यांना आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात येईल  

१०) पंढरपूर शहरात भरणा-या मोठ्या चार यात्रा भरतात म्हणुनच नगरपरिषदेने यात्रा अलाउन्स बाबत उपविधी करून यात्रा अलौन्स देण्याचा निर्णय घेतला आहे.तरी उपविधीची तपासणी करून याबाबत निर्णय घेण्यात येईल असे ठरले 

११) सानुग्राह अनुदान देण्याबाबत यापूर्वी निर्णय झाला असला तरी नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती विचारात घेता पुढच्या वर्षी निश्चितपणाने सानुग्रह अनुदान दिले जाईल असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले

 १२) पंढरपूर नगरपरिषदेमधील सेवानिवृत्त अथवा स्वेच्छा निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना त्वरीत सेवेत नियुक्ती देण्याचे ठरले. 

१३) पंढरपूर नगरपरिषदे मधील सेवेत असताना मयत झालेले कर्मचारी श्री.बंदपट्टे ,धोत्रे,रेवडकरी,

मिसाळ, जाधव, देशपांडे,लोखंडे, यांचा अनुकंपाखाली नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर केलेला आहे गेल्या दोन वर्षापासून अनुकंपा पात्र कर्मचारी म्हणुन मा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी प्रसिद्ध केली जाते परंतु अद्यापर्यत अनुकंपा नियुक्ती देण्यात आलेली नाही त्या बाबत कार्यवाही चालु असल्याचे सांगितले  

वरिल मागण्या मान्य झाल्याने दिनांक १७-१०-२०२२ पासून कामबंद आंदोलन मागे घेत असल्याचे अँड.सुनिल वाळुजकर व गुरू दोडिया यांनी जाहीर केले तसेच यावेळी प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव व मुख्याधिकारी अरविंद माळी,माजी आमदार प्रशांत परिचारक, आमदार समाधान दादा आवताडे यांचे आभार व्यक्त केले यावेळी आरोग्य निरीक्षक व कामगार संघटनेचे नेते नागनाथ तोडकर,कार्यालय अधीक्षक सुवर्णा डमरे, लेखापाल धनाजी साळुंखे, प्रीतम येळे, गणेश धारूरकर चिदानंद सर्वगोड, धनंजय वाघमारे,श्रीशैल्य चाबुकस्वार, दशरथ यादव, महावीर कांबळे, किशोर दंदाडे,मदन परमार, आकाश बनसोडे,अंबादास गोयल,गमजी वाघेला,सनी गोयल, रवी वाघेला,गोकुळ वाघेला,नाथा यादव हे यावेळी उपस्थित होते