"त्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा दया"

अ.भा.रिपब्लीकन पक्षाची पंढरपूरात उग्र निदर्शने

"त्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा दया"

"त्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा दया -

अ.भा.रिपब्लीकन पक्षाची पंढरपूरात उग्र निदर्शने

पंढरपूर-राजस्थान राज्यातील जालोर जिल्हयातील सुराणा गावातील नऊ वर्षीय इंद्र मेघवाल या विदयार्थ्याच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या शाळेचा मुख्याध्यापक छैल सिंग व त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य दोषी व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात यावी.  अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षाने भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे एका निवेदनाद्वारे तहसिलदार पंढरपूर यांच्यामार्फत केली आहे. 

          मंगळवार दि.23 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात आली.  यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सचिव डी.के.साखरे म्हणाले की, देश स्वातंत्रयाचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पाण्यासाठी एक दलित बालकाला आपला जीव गमवावा लागणे ही अत्यंत शरमेची व माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. 

          राजस्थानच्या जालोर जिल्हयातील सुराणा गावातील सरस्वती विदयामंदिर या शाळेत इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या दलित विदयार्थ्याला केवळ त्याने शिक्षकासाठी असलेल्या माठातील पाणी पिले म्हणून शाळेतील मुख्याध्यापक छैल सिंग यांनी दि. 22 जुलै 2022 ला अत्यंत क्रुरपणे जातीवादी अस्पृश्यतेच्या मानसिकतेतून जबर मारहाण केली.  त्यामुळे या विदयार्थ्याचा उपचारा दरम्यान 13 ऑगस्ट रोजी मृत्यु झाला. 

          इंद्रकुमारच्या या मृत्युला जबाबदार असलेल्या आरोपी छैल सिंग व त्याला सहकार्य करणाऱ्या अन्य दोषी व्यक्तीवरती कठोर कारवाई करुन  त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण तथाकथित लोक सदरचे प्रकरण दडपण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असून असे झाल्यास संपूर्ण राज्यामध्ये अखिल भारतीय रिपब्लीकन पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा साखरे यांनी दिला.  यावेळी पंढरपूर तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार पंडीत कोळी यांनी आंदोलन कर्त्यांना सामोरे येवून त्यांचे निवदन स्विकारले व आंदोलन कर्त्यांच्या मागण्या व भावना राष्ट्रपती महोदयांना आजच कळवित असल्याचे सांगितले. 

          या आंदोलनास दलित स्वयंसेवक संघाचे संस्थापक दिलीप देवकुळे, दलित पँथरचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदु खरे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा माया खरे,  पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष पदमिनी शेवडे, श्रीमंत आठवले, तालुकाअध्यक्ष लक्ष्मण तात्या वाघमारे, वनिता वजाळे, सोमण्णा सपांगे, रविंद्र काळे, प्रभावती गायकवाड, मंगल कांबळे, गवळण लोखंडे, राहुल लोखंडे, वैशाली चंदनशिवे, शब्बीर सयद, बाळाताई डावरे, प्रा.हणमंत आढाव, सुरेश शेवडे, समाधान काळे, अविंदा गायकवाड, संभाजी कुंभार, आक्काताई शिंदे, इंदु ढवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.