विठ्ठल कारखान्यातील यंत्रणेत बिघाड झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

विठ्ठल कारखान्यातील यंत्रणेत बिघाड झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

विठ्ठल कारखान्यातील यंत्रणेत बिघाड झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी

विठ्ठल कारखान्यातील यंत्रणेत बिघाड झाल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे.
 जखमीला खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर 
रविवार दिनांक ४.. डिसेंबर वेनुनगर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरील बॉयलिंग हाऊस मध्ये काम करत असताना हाऊस स्टीम प्रेशर वॉल फेल होऊन तुटून त्याचा दणका बसल्याने सुधाकर चौगुले राहणार ता. सांगवी याचा जागीच  मृत्यू झाला आहे.  तर सोमनाथ मारुती नरसाळे राहणार जळवली ता. पंढरपूर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.   हा सर्व प्रकार सकाळी ९.३०च्या दरम्यान विठ्ठल साखर कारखान्यात घडला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेला पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा प्रथमच सुरू झाला आहे. प्रत्येक साखर कारखान्याला फॅक्टरी इन्स्पेक्टर ही एक गव्हर्नमेंट पोस्ट असते त्यांचे नियंत्रणाखाली सेफ्टी एडिट केले जाते त्याप्रमाणे श्री विठ्ठल साखर कारखान्याला फॅक्टरी इन्स्पेक्टर आहे का ,? असेल तर त्यांनी विठ्ठल कारखान्याचे सेफ्टी एडिट केले आहे काय? तसेच कारखाना संदर्भात उदाहरण फायर ट्रेनिंग असेल किंवा कोणत्याही कारखाना कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर किंवा अंगावर वरून खाली कोणतेही अवजड सामान वस्तू पडून कामगाराच्या जीवितास धोका होऊ नये याची काळजी कारखान्याचे चेअरमन व संस्था चालक सदस्यांनी घेणे गरजेचे अन्यथा आज घडलेल्या घटने सारखी एखादी घटना कारखान्यामध्ये मोठी घडल्यास त्या कामगारांच्या जीवितास धोका होण्याचा संभव नाकारता येणार नाही. यावर्षीचा हंगाम सुरू करताना श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन व संचालक यांनी फॅक्टरी इन्स्पेक्टर कडून स्विफ्ट एडिट केले आहे का हे पाहणे गरजेचे आहे. साखर कारखाने सुरू करण्यासाठी साखर आयुक्त यांनी यावर्षी पंधरा दिवस अगोदर चालू करण्याचे आदेश साखर कारखानदारांना दिले होते त्यामुळे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक आणि घाई गडबड तर कारखाना सुरू करण्यासाठी केली त्यामुळे तरीही घटना घडली असावी का? अशा उलट सुलट चर्चा पंढरपूर तालुक्यातील सर्वत्र ठिकाणी सुरू आहे.
चालू हंगाम कारखान्याचे दोन लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्टही कारखान्याने पूर्ण केले आहे. मात्र याचवेळी आज सकाळच्या सुमारास कारखान्याच्या बॉयलिंग हाऊस मध्ये काम सुरू असताना हा मोठा अपघात घडला आहे. 
अपघातावेळी सुधाकर सदाशिव चौगुले (रा. सांगवी ता. पंढरपूर) व सोमनाथ मारुती नरसाळे (रा.जळोली ता. पंढरपूर)हे उत्पादन विभागाचे दोन कर्मचारी स्टीम वालचे काम करत होते. मात्र यावेळी यंत्रणेत बिघाड होऊन स्टीम हॉल निकामी झाला तसेच त्याचा दणका दोन्ही कामगारांना बसल्याने उंचीवरून कामगार खाली पडल्याने यामध्ये चौगुले यांचा मृत्यू झाला असून नरसाळे यांच्यावर उपचार सुरू आहे.सदर घटना घडल्यानंतर कारखाना प्रशासनाने  तात्काळ जखमी कामगारास रुग्णालयात दाखल केले आहे.